चॉकलेटचे आमिष दाखवत तरुणाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
By योगेश पांडे | Updated: July 20, 2023 16:26 IST2023-07-20T16:25:06+5:302023-07-20T16:26:13+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

चॉकलेटचे आमिष दाखवत तरुणाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
नागपूर : चॉकलेटचे आमिष दाखवत एका तरुणाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शिवशंकर राकेशकुमार शर्मा (१९, एमआयडीसी) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे शिवशंकरचे नेहमी येणे जाणे होते. ९ जुलै रोजी तो त्यांच्या घरी गेला व तक्रारदाराच्या पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिला चॉकलेट दिले व त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणालाही सांगू नको असे म्हणत त्याने तिला परत चॉकलेटचेच आमिष दाखविले.
घरी आल्यावर मुलीला वेदना सुरू झाल्या. तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले व त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आईने मुलीला विचारले असता तिने झालेला प्रकार सांगितला. हे ऐकून पालकांच्या पायाखालील जमीनच सरकली. पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी शिवशंकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.