वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे सहलीसाठी जात असताना बस अपघात, एका विद्यार्थीनीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:55 IST2024-11-26T14:37:52+5:302024-11-26T14:55:16+5:30
Nagpur : बसेस बोरधरणला जात असतांना ,त्यातील एका बसचा अपघात

A female student died in an accident while going for a trip at Bordharan in Wardha district
नागपूर: नागपुरच्या शंकरनगरस्थित सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाल्याने एका विद्यार्थ्यीनीचा मृत्यू झाला, तर ४० च्या वर विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना वर्धा रोडवरील एम्समध्ये, सात विद्यार्थी निम्समध्ये तर एका विद्यार्थ्याला प्लेटिना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. निर्वानी बागडे, रा. टाकळी सीम असे मृत विद्यार्थ्यांनीचे नाव आहे
शंकर नगर नागपूर येथील सरस्वती हायस्कूल चे विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील हरकुल्स या पिकनिक स्पॉट ला भेट देण्यासाठी पाच ट्रॅव्हल्स ने सकाळी निघाले होते. सकाळी ९ च्या सुमारास हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावसमोर घाटात . पेंढरी गावाजवळ चार बसेस समोर निघून गेल्या तर शेवटच्या बसचा वळणावर असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळण घेताना उलटली.यात विद्यार्थी व शिक्षक असे ५० पेक्षा जास्त प्रवासी होते. यात अर्ध्यापेक्षा जास्त प्रवाश्यांना मार लागला.१ मुलगी व १ शिक्षिका गँभिर जखमी असल्याने त्यांना व जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर किरकोळ जखमी ना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले . पालकांच्या मदतीसाठी एम्स व इतर रुग्णालयात मदत कक्ष निर्माण करण्यात आला आहे.