शेती विक्रीचा करार केला; सराफा व्यावसायिकाची ३७ लाखांनी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:50 IST2026-03-19T19:49:56+5:302026-03-19T19:50:50+5:30

Nagpur : कामठी येथे असलेल्या शेतीवर कर्ज असून, ही शेती कमी किमतीत विकायची असल्याचे सांगून आरोपी पती-पत्नीने एका सराफा व्यावसायिकाची ३७ लाखांनी फसवणूक केली.

A contract was signed to sell the farm; a bullion merchant was cheated of 37 lakhs | शेती विक्रीचा करार केला; सराफा व्यावसायिकाची ३७ लाखांनी फसवणूक

A contract was signed to sell the farm; a bullion merchant was cheated of 37 lakhs

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कामठी येथे असलेल्या शेतीवर कर्ज असून, ही शेती कमी किमतीत विकायची असल्याचे सांगून आरोपी पती-पत्नीने एका सराफा व्यावसायिकाची ३७ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिलीप नारायण निनावे (४८) आणि दर्शना दिलीप निनावे (४५, दोघे रा. विनोबा भावेनगर, तहसील) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पती-पत्नीची नावे आहेत. मनोज सुभाषराव निनावे (५०, रा. आशीर्वादनगर) यांचे तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत इतवारी, नाईक गल्ली, सराफा बाजारात मनोज निनावे ज्वेलर्स नावाचे ज्वेलरी शॉप आहे. आरोपी पती-पत्नी यांचे नेहमीच दुकानात येणे-जाणे असल्याने त्यांची सुभाष निनावे यांच्यासोबत ओळख होती. २२ सप्टेंबर २०२१ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान आरोपी दिलीप व दर्शना यांनी संगनमत करून मनोज निनावे यांना आपली कामठी येथे शेती असून, त्यावर कर्ज आहे. त्यामुळे शेती कमी किमतीत विकायची असल्याची बतावणी केली. मनोज निनावे यांचा आरोपींवर विश्वास बसल्याने त्यांनी आरोपींसोबत तोंडी करार करून ७एप्रिल २०२५ रोजी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून आरोपींना वेळोवेळी ३७ लाख रुपये दिले. परंतु आरोपींनी मनोज निनावे यांना शेतीची रजिस्ट्री करून न देता टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली.

या प्रकरणी मनोज निनावे यांच्या तक्रारीवरून तहसील ठाण्याचे उपनिरीक्षक सुशांत भगत यांनी आरोपीविरुद्ध कलम ३१४, ३१६ (२), ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title : भूमि सौदे में खटास: जौहरी के साथ ₹37 लाख की धोखाधड़ी।

Web Summary : नागपुर के कामठी में एक जौहरी को एक दंपति ने ₹37 लाख का चूना लगाया, जिन्होंने अपनी गिरवी रखी जमीन कम कीमत पर बेचने का वादा किया था। पुलिस ने आरोपी पति-पत्नी के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज किया है।

Web Title : Land deal turns sour: Jeweler defrauded of ₹37 lakhs.

Web Summary : A jeweler was defrauded of ₹37 lakhs by a couple in Kamathi, Nagpur, who promised to sell their mortgaged land at a low price. Police have registered a case against the accused husband and wife for fraud.