वीजेचा धक्का लागलेल्या ‘त्या’ बालकाचा अखेर मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: July 6, 2024 17:30 IST2024-07-06T17:29:52+5:302024-07-06T17:30:49+5:30
Nagpur : कुटुंबीयांना धक्का बसला असून परिसरात शोककळा

A boy eventually died because of electric shock
नागपूर : वाळलेले कपडे काढण्यासाठी गेला असताना वीजेचा धक्का लागून जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वेदांत रविकांत सोनेकर (१३, रा. साईनगर) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. शुक्रवारी २८ जूनला सायंकाळी ५.३० वाजता वेदांत आपल्या राहत्या घरी दुसऱ्या माळ्यावरील कपडे काढण्यासाठी गेला होता.
कपडे काढत असताना त्याला इलेक्ट्रीक वायरचा करंट लागल्याने तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. वेदांतच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे.