धक्कादायक! ७० वर्षाच्या वृद्धाकडून १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग

By योगेश पांडे | Updated: February 20, 2024 17:12 IST2024-02-20T17:11:52+5:302024-02-20T17:12:48+5:30

धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

a 70 years old man molested a 10 year girl in nagpur police case has been registered | धक्कादायक! ७० वर्षाच्या वृद्धाकडून १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग

धक्कादायक! ७० वर्षाच्या वृद्धाकडून १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग

योगेश पांडे, नागपूर : ७० वर्षीय वृद्धाकडून परिचयातील कुटुंबातील एका १० वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सुखराम उर्फ बाबू श्याम भोई (७०) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबाशी परिचय आहे. तेथील १० वर्षीय चिमुकली अनेकदा त्याच्याशी खेळायची. तो तिला अनेकदा खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जायचा. तो दोन दिवसांअगोदर तिला घरी घेऊन गेला व तिच्याशी अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. तो परिसरातील इतर मुलींकडे पाहूनदेखील नेहमीच अश्लील इशारे करायचा. अखेर पालकांनी धंतोली पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुखरामविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.

Web Title: a 70 years old man molested a 10 year girl in nagpur police case has been registered