शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
6
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
7
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
8
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
9
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
10
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
11
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
12
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
13
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
15
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
16
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
17
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
18
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
19
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
20
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडून ९३३ कोटींचे नियोजन

By admin | Updated: May 23, 2014 01:11 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्याने या बँकेडून होणारा पीक कर्जाचा पुरवठा राष्ट्रीयकृत बँकांकडे स्थानांतरित करण्यात आला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी पीक कर्जाचे ९३३ कोटींचे

 यंत्रणा तयार

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्याने या बँकेडून होणारा पीक कर्जाचा पुरवठा राष्ट्रीयकृत बँकांकडे स्थानांतरित करण्यात आला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी पीक कर्जाचे ९३३ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ७४६ कोटी रुपये खरीप हंगामासाठी तर १८७ कोटी रुपये रब्बी हंगामासाठी होते. १३९ कोटी रुपये जिल्हा बँकेला कर्ज वाटप करायचे होते. पण बँक अडचणीत असल्याने हे कर्ज वाटप राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांकडे वळते करण्यात आले आहे. आतापर्यंत ५५१९ शेतकर्‍यांना ४७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या जिल्ह्णात एकूण १७८ शाखा आहेत. त्यापैकी १५८ शाखांमधून पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सहकार खात्याने ५८ संपर्क अधिकार्‍यांची नियुक्ती केली असून प्रत्येक संपर्क अधिकार्‍याकडे तीन शाखांचे काम देण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या कर्जाची सर्व प्रकरणे बँक आॅफ इंडियाच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयातून मंजूर केली जाणार असल्याने त्याला विलंब होणार नाही, असा सहकार खात्याचा दावा आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक या दोन मोठ्या बँकांसोबतही सकार खात्याची चर्चा सुरू असून या बँकेतूनही बँक आॅफ इंडियाप्रमाणे यंत्रणा राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा सहकाही बँकेतून कर्ज घेणार्‍या व त्याची परतफेड करणार्‍या २६०० शेतकर्‍यांना कर्ज वाटपासाठी नाहरकत प्रमाणपत्रे देण्यात आली असून यापैकी ३३ शेतकर्‍यांची कर्जाची प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. खरीप हंगामात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी सहकार खात्याने यंत्रणा तयार केली आहे, असे खरीप आढावा बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)