नागपुरातील लग्न समारंभात ८.५० लाखाच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:10 IST2018-05-02T23:10:32+5:302018-05-02T23:10:45+5:30
कळमन्यात एका विवाह समारंभात महिला आरोपींनी ८.५० लाखाचे दागिने चोरल्याची घटना घडली.

नागपुरातील लग्न समारंभात ८.५० लाखाच्या दागिन्यांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यात एका विवाह समारंभात महिला आरोपींनी ८.५० लाखाचे दागिने चोरल्याची घटना घडली. गणेशपेठ येथील रहिवासी गारमेंट व्यापारी सुरेश अग्रवालच्या चुलत भावाचे २० एप्रिलला कळमनाच्या नैवेद्यम इस्टोरियात लग्न होते. सौरभचे कुटुंबीयही लग्नात आले होते. रात्री ७.३० वाजता सौरभची आई, पत्नी आणि इतर कुटुंबीय खोली क्रमांक ३११ मध्ये तयारी करीत होते. सौरभच्या आईने आपले दागिने पर्समध्ये ठेवले होते. तयारी झाल्यानंतर सौरभची आई आणि कुटुंबातील इतर सदस्य लग्नात गेले. खोलीत परतल्यानंतर त्यांना पर्समध्ये ठेवलेले दागिने चोरी झाल्याचे समजले. अग्रवाल कुटुंबीयांनी दागिन्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी कळमना पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एक महिला आणि युवती संशयास्पद अवस्थेत आढळल्या. त्या आधारे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. लग्न समारंभांची वेळ असल्यामुळे आगामी दिवसात अशा घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरचे गुन्हेगार येथे आलेले आहेत. ते पाहुण्यांच्या रूपाने लग्नात सहभागी होऊन अशा घटना घडवून आणतात.