शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

विदर्भातील ८४ हजार हेक्टर जमीन वनक्षेत्राखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 7:00 AM

ब्रिटिश काळामध्ये नोंद करण्यात आलेली संरक्षित असलेली आणि नोंदीवर न आलेली असंरक्षित अशी ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन विदर्भात आहे. वन विभागाने ती वनक्षेत्र म्हणून घोषित केली असून, यातील बहुतेक क्षेत्रातील जमीन ताब्यातही घेतली आहे.

ठळक मुद्देनागपूर सर्कलमध्ये सर्वाधिक ७० हजार हेक्टरवनविभागाकडून कार्यवाही सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रिटिश काळामध्ये नोंद करण्यात आलेली संरक्षित असलेली आणि नोंदीवर न आलेली असंरक्षित अशी ८४ हजार ४८६ हेक्टर जमीन विदर्भात आहे. वन विभागाने ती वनक्षेत्र म्हणून घोषित केली असून, यातील बहुतेक क्षेत्रातील जमीन ताब्यातही घेतली आहे.विदर्भात नागपूर सर्कलमध्ये सर्वाधिक म्हणजे ७०,६२९ हेक्टर जमीन असून, त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यात १०,२२८ हेक्टर जमीन आहे. यासोबतच यवतमाळ, चंद्रपूर सर्कल मिळून ही जमीन ८४,४८६ हेक्टर असल्याची नोंद घेण्यात आली आहे.संरक्षित, राखीव, झुडपी, खासगी वन, ई-क्लास फॉरेस्ट आणि रेव्हेन्यू फॉरेस्ट अशा प्रकारचे वनांचे वर्गीकरण केले जाते. भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम ४ व कलम २० मधील तरतुदीनुसार संरक्षित व असंरक्षित अशा प्रकारचे वर्गीकरण न झालेली जमीन ताब्यात घेण्याचे अधिकार वन विभागाला आहेत. मागील तीन वर्षापूर्वी वन विभागाने राज्यात असलेल्या संरक्षित आणि असंरक्षित जमिनीची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले होते. राज्यातील जमिनीची तफावत शोधल्यानंतर ५२ हजार ४९१ हेक्टर जमिनीची तफावत असल्याचे अहवालात सांगण्यात आले होते. दरम्यान, वन कायद्याच्या कलम ४ अंतर्गत २०१४ ते २०१९ या काळामध्ये राज्यात २ लाख ७ हजार २९१.९९ हेक्टर आणि कलम २० अंतर्गत १ लाख ३४ हजार ८५२ हेक्टर जमीन अवर्गीकृत व असंरक्षित असल्याचे नोंदविण्यात आले. तर विदर्भातील चार सर्कलमध्ये ८४,४८६ हेक्टर जमिनीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार वन विभागाने वन कायद्याचा आधार घेऊन ही जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

विशेष म्हणजे विदर्भात सर्वात अधिक अवर्गीकृत जमीन नागपूर विभागात अधिक आहे. ८४ हजार हेक्टरपैकी एकट्या नागपूर विभागात ७० हजार ६२९ हेक्टर जमीन आहे. यामुळे नागपूर विभागाच्या वनक्षेत्रात भविष्यात वाढ दिसणार आहे. तर चंद्रपूर विभागात सर्वात कमी म्हणजे ३४१ हेक्टर अवर्गीकृत जमीन आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस