शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १,१७२ गावांत पाणीटंचाईसाठी ८२ कोटींचा टंचाई आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:49 IST

Nagpur : उन्हाळ्यात ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे नियोजन करून, ८२ कोटी ९० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे नियोजन करून, ८२ कोटी ९० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यानुसार जिल्ह्यातील ११७२ गावांत २९०५ उपाययोजना प्रस्तावित आहे.

आराखड्यानुसार करण्यात येणारी टंचाईची कामे

टंचाई आराखड्यानुसार नळ योजना विशेष दुरुस्ती ४८९ कामे, १५३ नवीन विंधन विहीर, १४०७ विंधन विहीर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना ५२, सार्वजनिक विहीर खोलीकरण १९२६ कामे, टँकरद्वारे पाणीपुरवठा ९७, जलस्रोत बळकटीकरण १७० कामे टंचाई आराखड्यात आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या शासन निर्णयानुसार १ ते ९ उपाययोजनाव्यतिरिक्त १० वी उपाययोजना म्हणून नळ पाणीपुरवठा योजनेच्या स्रोताजवळ सोत बळकटीकरणाच्या विविध उपाययोजनांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत १७० कामावर १३.५९ कोटी रुपये खर्च होणार आहे.

टंचाई आराखड्याचा कालावधी

शासन निर्णयानुसार टंचाईचा कालावधी हा १ ऑक्टोबर ते ३० जून असतो. ३ टप्प्यांत हा आराखडा बनविण्यात येतो. सर्व तालुक्यातून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडे प्रस्ताव सादर होतात. त्याआधारे संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला जातो.

गेल्या वर्षीच्या तुलनेत होणार दुप्पट खर्च

२०२४-२०२५ वर्षातील आराखडा हा ३७कोटींचा होता. तो १२ कोटींनी वाढविण्यात आला होता. या वर्षात तब्बल दुपटीने हा आराखडा आहे.

बोअरवेलच्या खोदकामाला पुन्हा प्राधान्य

गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेने टंचाई आराखड्यात एकही नवीन बोअरवेल मंजूर केली नव्हती. फ्लशिंगच्या माध्यमातून जुनेच बोअरवेल रिचार्ज केले जात होते. मात्र, यावर्षीच्या आराखड्यात १५३ बोअरवेल घेण्यात आले आहेत.

"आराखड्यात तरतूद नसेल आणि गावाला टंचाई भासल्यास त्या गावात टंचाई निवारणार्थ उपायोजना घेता येत नाही. त्यामुळे संभाव्य टंचाईच्या दृष्टीने मोठ्या संख्येने गावांचा आराखड्यात समावेश केला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कामे विविध कारणामुळे अपूर्ण आहेत, अशी गावे आराखड्यात घेण्यात आली आहे. टंचाई आराखडा जरी गरजेपेक्षा जास्त दिसत असला तरी जिथे आवश्यकता असते तिथेच शासकीय निकषानुसार उपाययोजना राबविण्यात येतात. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे."- अशोक धोंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प., नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: ₹82 Crore Drought Plan for 1,172 Villages Approved

Web Summary : Nagpur's Zilla Parishad prepares ₹82.9 crore drought plan to address water scarcity in 1,172 villages. The plan includes repairs, new borewells, well deepening, and tanker water supply, prioritizing areas with incomplete water projects. Focus on source strengthening with ₹13.59 crore allocated for 170 works.
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूकnagpurनागपूर