खेळण्यासाठी जात असलेल्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 09:24 PM2021-10-25T21:24:36+5:302021-10-25T21:27:59+5:30

अभ्यंकरनगरात राहणाऱ्या देवश्री कडबे या ८ वर्षीय मुलीला मोकाट कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले.

8-year-old Chimukali, who was going to the garden to play, was bitten by a dog; Citizens angry | खेळण्यासाठी जात असलेल्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; नागरिक संतप्त

खेळण्यासाठी जात असलेल्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; नागरिक संतप्त

googlenewsNext
ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांची पोलीस ठाण्यात तक्रार

नागपूर : अभ्यंकरनगरात राहणाऱ्या देवश्री कडबे या ८ वर्षीय मुलीला मोकाट कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून, परिसरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत असून, अनेक लहानग्यांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. परिसरातील नागरिकांनी या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

देवश्री सकाळी ९.३०च्या सुमारास खेळण्यासाठी गार्डनमध्ये जात होती. त्याच वेळी एका कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. तिच्या पायाला चावा घेऊन जखमी केले. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मुलगी दहशतीत आहे. परिसरातील लोकांनी सांगितले की, एक व्यक्ती या मोकाट कुत्र्यांना खाऊपिऊ घालतो. त्यामुळे परिसरातील सर्व कुत्रे एकाच ठिकाणी जमतात. यापूर्वीही कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केले आहे. त्यात ते थोडक्यात बचावले.

हे मोकाट कुत्रे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या मागे धावतात. कुत्र्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती लोकांनी व्यक्त केली. मोकाट कुत्र्यांना खाऊपिऊ घालणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातही लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे.

Web Title: 8-year-old Chimukali, who was going to the garden to play, was bitten by a dog; Citizens angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा