बिहारमध्ये मुळगावी गेले असता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या घरातून ८ लाखांची चोरी
By दयानंद पाईकराव | Updated: July 20, 2024 16:09 IST2024-07-20T16:07:58+5:302024-07-20T16:09:03+5:30
Nagpur : अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ; आरोपीचा शोध सुरु

8 lakh stolen from the house of a transport businessman
नागपूर : भावासोबत बाहेरगावी गेलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या घरातील ८ लाख रुपयांची रोख अज्ञात आरोपीने चोरुन नेली. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जुलैला सायंकाळी ५.३० ते १८ जुलैला रात्री ११ दरम्यान घडली. राजकुमार राजेंद्रप्रसाद सिंग (३२, रा. सुमिती इन्क्लेव्ह, अंकाशी सोसायटी, दाभा) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. ते आपल्या भावासोबत कुटुंबीयांना घेऊन बिहारमधील आपल्या मुळ गावी गेले होते.
अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मागील दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने आलमारीत ठेवलेल्या ५०० रुपयांच्या नोटा किंमत १ लाख ५० हजार आणि दिवाणमध्ये ठेवलेल्या ५०० रुपयांच्या नोटा किंमत ६ लाख ५० हजार असा एकुण ८ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान ठाण्याच्या उपनिरीक्षक सुप्रीया पुंडगे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), (३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.