विदर्भातील ७.३४ लाख पालकांनी उघडले 'सुकन्या समृद्धी' योजनेसाठी खाते ! काय आहे ही योजना आणि प्रक्रिया ?

By दयानंद पाईकराव | Updated: April 13, 2026 13:27 IST2026-04-13T13:22:04+5:302026-04-13T13:27:47+5:30

Nagpur : वडिलांसाठी लेक म्हणजे काळजाचा तुकडा अन् आयुष्याची खरी पुंजी. तिच्या बोबड्या बोलांनी घराचे नंदनवन होते, पण तिची पावले मोठी होऊ लागली की, वडिलांच्या मनात तिच्या भविष्याच्या चिंतेचा काहूर माजतो.

7.34 lakh parents in Vidarbha have opened accounts for 'Sukanya Samriddhi' scheme! What is this scheme and the process? | विदर्भातील ७.३४ लाख पालकांनी उघडले 'सुकन्या समृद्धी' योजनेसाठी खाते ! काय आहे ही योजना आणि प्रक्रिया ?

7.34 lakh parents in Vidarbha have opened accounts for 'Sukanya Samriddhi' scheme! What is this scheme and the process?

दयानंद पाईकराव 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वडिलांसाठी लेक म्हणजे काळजाचा तुकडा अन् आयुष्याची खरी पुंजी. तिच्या बोबड्या बोलांनी घराचे नंदनवन होते, पण तिची पावले मोठी होऊ लागली की, वडिलांच्या मनात तिच्या भविष्याच्या चिंतेचा काहूर माजतो. आपल्या 'राजकन्ये'च्या स्वप्नांना कधी पैशांची कमतरता भासू नये, यासाठी मागील ११ वर्षात विदर्भातील ७.३४ लाख पित्यांनी 'सुकन्या समृद्धी' योजनेतून लेकीच्या भविष्याची सुरक्षित तटबंदी उभारली आहे.

मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या या मोहिमेत नागपूर जिल्ह्याने विदर्भात अव्वलस्थान पटकावले आहे, तर अमरावती जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही योजना केवळ आर्थिक बचत नाही, तर मुलींना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पडलेले एक भक्कम पाऊल ठरत आहे.

काय आहे ही योजना आणि प्रक्रिया ?

  • सुकन्या समृद्धी योजनेची रचना पालकांसाठी अतिशय सुलभ ठेवण्यात आली आहे. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मुलीच्या जन्माचा दाखला, पालकांचे ओळखपत्र आणि रहिवासी पुरावा सादर केल्यास हे खाते उघडता येते.
  • विशेष म्हणजे, वर्षाला किमान २५० रुपयांपासून ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सोय यात आहे. ही गुंतवणूक १५ वर्षापर्यंत करायची असून, त्यावर सध्या ८.२ टक्के असा अत्यंत आकर्षक व्याजदर दिला जात आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश मुलीच्या उच्चशिक्षणाची सोय करणे हा आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर किंवा तिने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, तिच्या पुढील शिक्षणासाठी खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची मुभा मिळते. तसेच, २१ वर्षांनंतर हे खाते पूर्णतः बंद होऊन व्याजासह एक मोठी रक्कम पालकांच्या हाती येते, जी लग्नासाठी किंवा उच्च करिअरसाठी वरदान ठरते.

 

जिल्हा - उघडलेली एकूण खाती
नागपूर - १,४३,६५०
अमरावती - १,१४,०४५
वाशिम व अकोला - १,१७,३७६
गडचिरोली व चंद्रपूर - ८६,५११
गोंदिया व भंडारा - ८१,११५
बुलढाणा - ७५,४३७
यवतमाळ - ७५,४३४
वर्धा - ४०,३४३
एकूण विदर्भ - ७,३३,९११

"सरपंच, पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन गावातील प्रत्येक मुलीचे या योजनेत खाते उघडून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित गावही सुकन्या समृद्ध गाव म्हणून ओळखले जाईल."

- डॉ. सुधीर जाखेरे, संचालक, डाक सेवा विदर्भ विभाग

Web Title : विदर्भ में 7.34 लाख अभिभावकों ने सुकन्या समृद्धि योजना में निवेश किया।

Web Summary : विदर्भ के 7.34 लाख से अधिक माता-पिता ने सुकन्या समृद्धि योजना में निवेश कर बेटियों का भविष्य सुरक्षित किया। नागपुर अग्रणी है, जो प्रति वर्ष ₹1.5 लाख तक के निवेश पर 8.2% ब्याज प्रदान करता है, जिससे शिक्षा और विवाह को बढ़ावा मिलता है।

Web Title : Vidarbha parents invest in Sukanya Samriddhi Yojana for daughters' secure future.

Web Summary : Over 7.34 lakh Vidarbha parents invested in Sukanya Samriddhi Yojana, securing daughters' futures. Nagpur leads, offering 8.2% interest on investments up to ₹1.5 lakh annually, promoting education and marriage.