शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

शेअर बाजारात तिप्पट नफ्याचे आमिष दाखवत ६५ लाखांचा गंडा

By योगेश पांडे | Updated: February 21, 2023 17:28 IST

पाच जणांची फसवणूक : पत्नी व मृतक पतीविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवत ६५ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदविला असून पतीचे दीड वर्षांअगोदर निधन झाले आहे. त्यामुळे पत्नीच्या चौकशीवरच पोलिसांचा भर राहणार आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

हरीष कोलार (५३, पांडे ले आऊट) व त्यांच्या पत्नीची फेब्रुवारी २०१८ मध्ये दीपक जयंतीलाल कुरानी व हीना दीपक कुरानी (पूनम विहार, स्वावलंबी नगर) यांच्याशी भेट झाली. शेअर मार्केट व रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट नफा होईल, असे आमिष त्यांनी दाखविले. त्यांच्यावर विश्वास ठेवून कोलार दांपत्याने कुरानीकडे ४१ लाख रुपये गुंतवले.

कोलार यांनी त्यांचे मित्र रमाकांत उमप (काटोल), परेश पटेल (धंतोली), मुकेश पटेल (नंदनवन) व मिलींद वंजारी (बापूनगर) यांनादेखील संबंधित स्कीमबाबत माहिती दिली. त्यांनीदेखील अनुक्रमे १.१० लाख, ७.१६ लाख, ११ लाख व ५ लाख रुपये गुंतविले. २६ फेब्रुवारी २०१८ ते १२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पाच जणांनी कुरानीकडे ६५.२६ लाख रुपये दिले. मात्र कुरानी दांपत्याने गुंतवणूकदारांना कुठलाही नफा दिला नाही व पैसेदेखील परत केले नाही.

याबाबत तक्रारदारांकडून वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र काही ना काही कारण सांगून कुरानीने टाळाटाळ केली. ९ डिसेंबर २०२१ रोजी दीपक कुरानीचे ह्रद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अखेर कोलार यांनी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीनंतर प्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरfraudधोकेबाजीshare marketशेअर बाजार