शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा मंगळवारी मुख्य सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 19:52 IST

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर ‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिना’चा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देथायलंडचे भदन्त अनेक व मन्यामारचे बौद्ध उपासक टेंग ग्यॉर मुख्य अतिथी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर ‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिना’चा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा अनेक व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार तर अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई उपस्थित राहतील.

दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणारे युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनिष्ट रूढी व परंपरेत अडकलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दर अशोक विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. शनिवारपासून सुरू झालेल्या या सोहळयाचा तिसऱ्या दिवशी रविवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, भन्ते नागदीपांकर, समता सैनिक दलाचे प्रदीप डोंगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमोद गेडाम, मधुकर मेश्राम, देवकुमार रंगारी, कैलाश वारके, शरद मेश्राम आदी उपस्थित होते. 
सायंकाळी ६ वाजता भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली धम्मपरिषद घेण्यात आली. यावेळी भारतासह जपान, थायलंड, मलेशिया व इतरही देशातील आलेल्या बौद्ध भिक्खूंनी आपले विचार मांडले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धम्मदीक्षा विधी सोहळ्यात पाच हजारावर अनुयायांंनी धम्मदीक्षा घेतली. उद्या मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या आयोजनासाठी स्मारक समितीसोबतच पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य सेवा व इतरही शासकीय यंत्रणा दिवसरात्र राबत आहे.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी