शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नागपूर महानगरपालिकेच्या टॅक्सची ५७५ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 11:21 IST

Nagpur News Nagpur Municipal Corporation ३.८७ लाख मालमत्ताधारकांकडे तब्बल ५७५ कोटीची थकबाकी आहे.

ठळक मुद्दे३.८७ लाख थकबाकीदार५११ मालमत्ताधारकांकडे २२० कोटी

गणेश हुडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. यातून सावरण्यासाठी कर वसुलीवर भर देण्याची गरज आहे. मात्र मागील सात महिन्यापासून यंत्रणा कोविड - १९ च्या नियंत्रणात लागल्याने मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. ३.८७ लाख मालमत्ताधारकांकडे तब्बल ५७५ कोटीची थकबाकी आहे. यात शासकीय व निमशासकीय मालमत्ता, न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, होर्डिंग्ज व खासगी अशा ५११ मालमत्ताधारकांकडे थकीत असलेल्या २२० कोटीचा समावेश आहे.कर आकारणी व कर संकलन विभागाच्या नोंदीनुसार नागपूर शहरात ६.३५ लाख मालमत्ता आहेत. २०२०-२१ या वर्षात ५ लाख ९४ हजार ७०० मालमत्ताधारकांकडून १९७ कोटी कर येणे आहे, तर २३ आॅक्टोबरपर्यंत १००.१३ कोटीची वसुली झाली आहे. मागील वर्षात याच कालावधीत ११७ कोटीची वसुली झाली होती. मोठ्या प्रमाणात नवीन मालमत्तावर कर आकारण्यात आल्याने वित्त वर्षात कर वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र कोरोनाचा वसुलीला फटका बसला आहे. दिलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.

६.३५ लाख मालमत्ताधारकांपैकी १ लाख ९५ हजार ३९६ मालमत्ताधारकांकडे ५ हजारापर्यंत कर येणे आहे. त्यांच्याकडे ४६ कोटी थकीत आहे. ५ ते २५ हजारापर्यंत थकीत मालमत्ता कर असलेल्यांची संख्या १ लाख ६७ हजार ६९४ आहे. त्यांच्याकडून १८२ कोटी येणे आहे. २५ ते ५० हजारापर्यंत १६ हजार ८६९ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ५६ कोटी थकीत आहे. ५० हजार ते १ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या ४ हजार ४६७ मालमत्ताधारकांकडून ३० कोटी, १ ते ५ लाखापर्यंत थकबाकी असलेल्या २ हजार १३० मालमत्ताधारकांकडे ४१ कोटी थकीत आहे. ५ लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या ५११ मालमत्ताधारकांकडे २२० कोटी थकीत आहे.

उद्दिष्ट २९० कोटी, तीन महिन्यात जमा २४.६२ कोटीमनपा आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीसाठी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वषार्साठी २९० कोटीचे उद्दिष्ट दिले आहे. यात दर महिन्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु एप्रिल ते जून या तीन महिन्यात जेमतेम २४.६२ कोटीची वसुली झाली.कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारीमनपाच्या कर आकारणी व वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर कोविड नियंत्रणाची जबाबदारी होती. आता माझे कुटुंब व माझी जबाबदारी सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी कर वसुलीवर परिणाम झाला आहे. कोविड-१९ चा फटका कर वसुलीला बसला आहे.नवीन मालमत्तांचा समावेशआजवर कर आकारण्यात न आलेल्या मालमत्तांवर प्रथमच कर आकारण्यात आलेल्या मालमत्तांची संख्या मोठी आहे. अशा मालमत्तांवर मागील सहा वषार्पासून कर आकारणी करण्यात आल्याने थकबाकीत भर पडली आहे. त्यात कोरोनाचाही वसुलीवर परिणाम झाला.मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका