१५ वर्षांत सोन्यात मिळाला ५५,८१६ रुपयांचा परतावा

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 9, 2024 06:55 PM2024-04-09T18:55:56+5:302024-04-09T18:57:05+5:30

दरवर्षीच्या गुढीपाडव्याला असलेल्या सोन्याचा दराचा आढावा घेतला. १६ मार्च २०१० रोजी गुढीपाडव्याला सोन्याचे दर १६,४८४ रुपये तर ९ एप्रिल २०२४ रोजी सोने ७२,३०० रुपयांवर पोहोचले.

55,816 rupees returned in gold in 15 years | १५ वर्षांत सोन्यात मिळाला ५५,८१६ रुपयांचा परतावा

१५ वर्षांत सोन्यात मिळाला ५५,८१६ रुपयांचा परतावा

नागपूर : सोने किती महाग झाले, असे म्हणत भारतीय सोन्याच्या गुंतवणुकीला अजूनही प्राधान्य देतात. पिढ्यानपिढ्या सोन्याचे अलंकार जपत आलेल्या भारतीयांची सोन्याची आसक्ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता सोने प्रतिदहा ग्रॅम ७२ हजाराच्या पुढे गेले तरीही खरेदी कमी झालेली नाही.

दरवर्षीच्या गुढीपाडव्याला असलेल्या सोन्याचा दराचा आढावा घेतला. १६ मार्च २०१० रोजी गुढीपाडव्याला सोन्याचे दर १६,४८४ रुपये तर ९ एप्रिल २०२४ रोजी सोने ७२,३०० रुपयांवर पोहोचले. ग्राहकांना गेल्या १५ वर्षांत सोन्यातून तब्बल ५५,८१६ रुपयांचा परतावा मिळाला. केंद्र सरकारने १ जुलै २०२७ पासून सोन्यावर ३ टक्के जीएसटी आकारणी केली. त्यामुळे ३० जून २०१७ च्या तुलनेत १ जुलै २०१७ पासून सोने जीएसटी आकारून महाग झाले. शिवाय आता मेकिंग चार्जही वाढले आहे. याच कारणांनी सोनेखरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

सोने एप्रिलमध्ये ३,३०० रुपयांची वाढ

यंदा मार्च महिन्यात सोन्याचे दर ५,३०० रुपये तर एप्रिलमध्ये केवळ नऊ दिवसांत ३,३०० रुपयांनी वाढले आहे.१ एप्रिलला दहा ग्रॅम शुद्ध सोने ६९ हजारावर होते. सोमवार, ८ एप्रिलच्या तुलनेत मंगळवारी एक हजार रुपयांची वाढ होऊन भाव ७२,३०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटीसह ७४,४६९ रुपयांवर गेले आहेत. त्यानंतरही गुढीपाडव्याला ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होती. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

चांदीत ७,३०० रुपयांनी वधारली

केवळ एप्रिल महिन्यात चांदीचे प्रतिकिलो दर ७,४०० रुपयांनी वाढले आहेत. १ एप्रिलला ७५,९०० रुपये असलेले भाव ९ एप्रिल रोजी ८३,२०० रुपयांवर पोहोचले. ३ टक्के जीएसटीसह ८५,६९६ रुपयांवर गेले.

गुढीपाडवा तारीख सोन्याचे दर
१६ मार्च २०१० १६,४८४
४ एप्रिल २०११ २०,६८६
२३ मार्च २०१२ २८,०७८
११ एप्रिल २०१३ २९,१८८
३१ मार्च २०१४ २८,५११
२१ मार्च २०१५ २६,१७०
८ एप्रिल २०१६ २८,९७४
२९ मार्च २०१७ २८,६५१
१८ मार्च २०१८ ३०,२२४
६ एप्रिल २०१९ ३१,८८४
२५ मार्च २०२० ४२,१५०
१३ एप्रिल २०२१ ४६,९४८
२ एप्रिल २०२२ ५१,४३५
२२ मार्च २०२३ ५८,७४१
९ एप्रिल २०२४ ७२,३००
(१ जुलै २०१७ पासून सोन्यावर ३ टक्के जीएसटी लागू)

Web Title: 55,816 rupees returned in gold in 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.