शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लाखमोलाचे ५२ जावई !

By admin | Updated: April 13, 2016 03:01 IST

लाख चकरा मारल्यानंतरही अनुकंपाधारकांना विद्यापीठात नोकरी मिळत नाही.

निवृत्तांसाठी तिजोरी; अनुकंपाधारकांशी मुजोरी : ६९ लाख रुपयांचे आऊटपुट काय ?जितेंद्र ढवळे नागपूरलाख चकरा मारल्यानंतरही अनुकंपाधारकांना विद्यापीठात नोकरी मिळत नाही. मात्र लाखमोलाच्या ५२ जावई (सेवानिवृत्त) कर्मचाऱ्यांवर वर्षाला ६९ लाख रुपयांची उधळपट्टी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून केली जात आहे. या कर्मचाऱ्यांचे नेमके आऊटपुट काय? त्यांनी कामात चुका केल्यातरी कोणतीही कारवाई नाही, याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फौज विद्यापीठ प्रशासनाच्या डोक्यावर बसत आहे. अंतर्गत राजकारणामुळे विद्यापीठात पदभरती बंद आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी प्रशासन गतिमान करण्याचा संकल्प केला असला तरी त्यांच्या ‘गती’वर बाण चालला आहे. त्यामुळे प्रशासनावर येत असलेल्या भाराचे कारण देत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भरणा गत दोन वर्षांपासून केला जात आहे. ही संख्या आता ५२ वर पोहोचली आहे. याउलट पदभरतीची कोंडी कशी फोडता येईल, याबाबत प्रशासन गप्प आहे. पदभरती फाईल बंद करण्यात आल्या आहेत. विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत सेवेत समावून घेण्याचा निर्णय तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने घेतला होता. गुणवंतांना प्राधान्य का नाही ?सेवानिवृत्तीनंतर व्यक्तीची काम करण्याची क्षमता कमी होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम तर जास्त आऊटपुटचे आहे. मात्र ज्यांनी आयुष्यभर संगणक हाताळला नाही ते कर्मचारी पेपरलेस प्रशासनात काम कसे करणार, यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विविध विभागात जे सेवानिवृत्त कर्मचारी सध्या कार्यरत आहेत त्यांच्या कामाचे स्वरूप काय आहे ? ते त्यास तितका वेळ देतात का ? हे तपासण्याची गरज आहे. याउलट कमवा आणि शिका योजनेंतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव देता येईल का किंवा कमवा आणि शिका योजनेची व्याप्ती वाढवता येईल का, यावर मंथन होणे गरजेचे आहे.