दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:38 IST2018-06-02T23:38:31+5:302018-06-02T23:38:50+5:30

दारुबंदी झालेल्या चंद्रपूरला दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाने दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या.

490 bottles of liquor seized in South Express | दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : चंद्रपूरला दारूची तस्करी सुरूच


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : दारुबंदी झालेल्या चंद्रपूरला दारूची तस्करी सुरूच असून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे सुरक्षा दलाने दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४९० बाटल्या जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य किशोर चौधरी यांना १२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसने दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी याची सूचना गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर यांना दिली. त्यावर डी. डी. वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे, शशिकांत गजभिये यांच्या चमूने दक्षिण एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक ३ वर आली असता या गाडीच्या एस ४ कोचची तपासणी केली. यावेळी कोचमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीटखाली ५ बेवारस बॅग ठेवलेल्या होत्या. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ३४३०० रुपये किमतीच्या ४९० बाटल्या आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

Web Title: 490 bottles of liquor seized in South Express