४८० एनसीसी सहायक अधिकारी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 22:43 IST2022-10-22T22:42:31+5:302022-10-22T22:43:35+5:30
Nagpur News कामठीच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून ४८० एनसीसी सहायक अधिकारी उत्तीर्ण झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी शनिवारी पासिंग आउट परेडद्वारे सलामी दिली.

४८० एनसीसी सहायक अधिकारी उत्तीर्ण
नागपूर : कामठीच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून ४८० एनसीसी सहायक अधिकारी उत्तीर्ण झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी शनिवारी पासिंग आउट परेडद्वारे सलामी दिली.
कॅडेट प्रशिक्षण अधिकारी रिशू राय यांच्या नेतृत्वात काढलेल्या पासिंग आउट परेडचा एनसीसी ओटीए कमांडंट मेजर जनरल कपिलजीत सिंह राठाेड यांनी आढावा घेतला. हे सहायक अधिकारी ७५ दिवसांच्या कठाेर परिश्रमातून जात यशस्वी झाले. या दरम्यान, त्यांनी शारीरिक प्रशिक्षण, याेग, कवायत, लष्करी प्रशिक्षणासह नेतृत्व गुण, व्यक्तिमत्त्व विकास, तसेच सामाजिक जागरूकता आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले. उत्तीर्ण कॅडेट अधिकाऱ्यांनी प्रभावी राष्ट्र उभारणीसाठी एनसीसीचे उद्दिष्ट्य डाेळ्यासमाेर ठेवण्याचे आवाहन मेजर जनरल कपिलजीत सिंग यांनी केले. हे कॅडेट्स तरुणांसाठी राेल माॅडेल म्हणून काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.