शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

केंद्रीय जीएसटी विभागात ४२,१३१ पदे रिक्त, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 26, 2023 15:12 IST

नागपूर झोनमध्ये जागांचा समावेश : थकबाकी वाढली, वसुली थांबली  

नागपूर : देशात केंद्रीय वस्तू व सेवा कराचे (सीजीएसटी) संकलन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात रोजगार वाढविण्याची घोषणा करतात, तर दुसरीकडे विविध शासकीय विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. देशात सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागात रिक्त पदांची संख्या जवळपास ४५ टक्के आहे. या संदर्भातील डाटा केंद्रीय अप्रत्यक्ष कर बोर्डाने १ एप्रिलला वेबसाइटवर प्रकाशित केला आहे.

प्रकाशित आकडेवारीनुसार संपूर्ण देशात केंद्रीय जीएसटी व सीमा शुल्क विभागात ९१,७४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९,६१३ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ४२,१३१ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.

नागपूर झोनमध्ये रिक्त पदे वाढली

रिक्त पदांमध्ये नागपूर झोनची स्थितीसुद्धा खराब आहे. नागपूर झोनमध्ये १,५७० पदे मंजूर आहेत. त्यामध्ये ८४४ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ७२६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण वाढला आहे. फेक इन्व्हाईस अर्थात कोट्यवधींच्या करचोरीची प्रकरणे वाढली आहेत. त्याचा तपास आणि करचोरट्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे थकबाकी वाढून वसुलीवर विपरित परिणाम होत आहे. विभागात किमान ७० ते ८० टक्के कर्मचारी कार्यरत राहिल्यास महसुलात आणखी वाढ होणार असल्याचे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मत आहे.

देशात विभागातील पदांची स्थिती

ग्रुप - मंजूर - कार्यरत - रिक्तग्रुप ह्यएह्ण ६,३९५ - ३,४९४ - २,९०१ग्रुप ह्यबीह्ण गॅझेटेड - २२,२१९ - १८,२०६ - ४,९१३ग्रुप ह्यबीह्ण नॉन गॅझेटेड - ३२,३४५ - १५,८९२ - १६,४५३ग्रुप ह्यसीह्ण - ३०,७८५ - १२,०२१ - १८,७६४एकूण - ९१,७४४ - ४९,६१३ - ४२,१३१

नागपूर झोनमधील पदांची स्थिती

पदनाम - मंजूर - कार्यरत - रिक्तमुख्य आयुक्त कार्यालय १२६ - ४५ - ८१अपील नागपूर - ३२ - १३ - १९ऑडिट नागपूर - १४२ - ७३ - ६९नागपूर - १ - २५२ - १५५ - ९४नागपूर - २ - २२० - १३१ - ८९नाशिक - २५५ - १६२ - ९६अपील नाशिक - ४५ - १४ - ३१ऑडिट नाशिक - १७६ - ९६ - ८०औरंगाबाद - २४१ - १४६ - ९५सेझ - ८१ - ९ - ७२१५७० ८४४ ७२६

कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला

दहा वर्षांपासून रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक केसेस पेडिंग आहेत. कोट्यवधींची थकबाकी आहे. पंतप्रधानांच्या विशेष भरतीने काही फरक पडला नाही. जीएसटी कलेक्शनची माहिती लोकांना कळते, पण करचोरीची माहिती कुणालाही कळत नाही. याची चौकशी व्हावी. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

- संजय थूल, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम्स, सेंट्रल एक्साईज अ‍ॅण्ड जीएसटी एससी/एसटी एम्पॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशन.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयnagpurनागपूरjobनोकरी