शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

रिजनल जेरियाट्रिक सेंटरसाठी राज्याचा ४० टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:30 AM

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत मध्यभारतातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘रिजनल जेरियाट्रिक सेंटर’च्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली आहे. यात ६० टक्के वाटा केंद्र शासनाचा तर ४० टक्के वाटा हा राज्य शासनाचा राहणार आहे.

ठळक मुद्देसामंजस्य कराराला मंजुरी : मेडिकलमध्ये ३० खाटांचे होणार विभाग

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत मध्यभारतातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘रिजनल जेरियाट्रिक सेंटर’च्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली आहे. यात ६० टक्के वाटा केंद्र शासनाचा तर ४० टक्के वाटा हा राज्य शासनाचा राहणार आहे.वयस्कांचे आजार वेगळे असतात, त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये वयस्कांसाठी स्वतंत्र वॉर्ड असायला हवे, अशी मागणी देशभरात गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती. २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत (नॅशनल प्रोग्रॅम फॉर हेल्थ केअर आॅफ द एल्डरली-एनपीएचसीई) विभागीय जेरियाट्रिक केंद्रासाठी (रिजनल जेरियाट्रिक सेंटर) नागपूर मेडिकलची निवड केली. परंतु या प्रकल्पाला घेऊन सामंजस्य करारच झाला नव्हता. यामुळे हा प्रकल्प रखडला होता. सोमवारी या कराराला मंजुरी देण्यात आली. यात मेडिकलमध्ये हे केंद्र स्थापित करण्यास, अर्थसाहाय्यासाठी राज्य शासनाचा ४० टक्के हिश्श्याचे दायित्व स्वीकारण्यास, करारपद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची पदे तीन वर्षांनंतर नियमित स्वरुपात भरण्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यास आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांना हा करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, हे केंद्र ३० खाटांचे असणार असून मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागांतर्गत (मेडिसीन) चालविले जाईल. परंतु या केंद्रासाठी स्वतंत्र बांधकाम केले जाईल की, ‘मेडिसीन’ विभागाच्याच ओपीडीत किंवा आणखी पर्यायी ठिकाणी याची व्यवस्था केली जाईल, याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. मात्र, ३० खाटांचा हा स्वतंत्र वॉर्ड असणार असून अनेक अद्ययावत सोई येथे उपलब्ध असणार आहेत. सोबतच या विभागासाठी स्वतंत्र डॉक्टर व कर्मचाºयांची व्यवस्था असेल.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर