भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी; ४ ठार, ८ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 10:57 IST2022-01-02T10:08:58+5:302022-01-02T10:57:23+5:30

रविवारी पहाटे ३ च्या सुमारास संत्रा भरून जात असलेली भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. तर, ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

4 killed, 8 seriously injured as bolero pickup overturns after collides on to tree | भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी; ४ ठार, ८ गंभीर जखमी

भरधाव पिकअप झाडावर आदळून पलटी; ४ ठार, ८ गंभीर जखमी

नागपूर : काटोल तालुक्यातील इसापूर शिवारात भरधाव बोलेरो पिकअप झाडावर आदळून चार मजुरांचा मृत्यू झाला तर, तर ७ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे सम्पूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून ग्रामीण रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी सकाळपासूनच गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार मोहपा येथे बोलेरो पिकअप (एमएच ३६ एफ ३१६३) संत्रा भरून मोहपा सावनेर मार्गावरून काटोल तालुक्यातील अंबाडा काटोल येथे परत येत होते. या वाहनात १० मजूर व चालक असे ११ जण होते. दरम्यान इसापूर शिवारात हा अपघात झाला. 

या घटनेत, मनीषा कमलेश सलाम ३८, मंजुषा प्रेमदास उईके ४०,कलाताई गंगांधर परतेती ५०, यांचा जागीच मृत्यू झाला तर मंजुळा वसंता धुर्वे ५० यांच्यावर नागपूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर, जखमी वृंदा अशोक दूधकवले १७, चैतानी स्लॅम ३०, कलावंता संतोष पेंदाम ५५, येनुबाई दूधकवळे ३०, लक्ष्मीबाई तायडे ३४ सर्व राहणार अंबाडा सोनक व विशाल बॉंदे ३५ मोहपा, आकाश बत्तासे मोहपा हे गंभीर जखमी झाले, सर्व जखमींवर नागपूर  येथे उपचार सुरू आहे

Web Title: 4 killed, 8 seriously injured as bolero pickup overturns after collides on to tree