नागपूर जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:10 AM2019-11-01T11:10:51+5:302019-11-01T11:12:42+5:30

पावसाची दडी, मध्यंतरी कोसळलेला संततधार पाऊस व प्रतिकूल वातावरणातून वाचलेली नागपूर जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, धान व इतर खरीप पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली आहेत.

4% crop loss in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान

नागपूर जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटकाबोंडामधील सरकीसह सोयाबीन अंकुरले

सुनील चरपे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरुवातीला पावसाची दडी, मध्यंतरी कोसळलेला संततधार पाऊस व प्रतिकूल वातावरणातून वाचलेली नागपूर जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, धान व इतर खरीप पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली आहेत. सततचा पाऊस आणि वातावरणातील दमटपणा यामुळे कपाशीची बोंडे सडली असून, आत असलेल्या कापसातील सरकी व शेंगांमधील सोयाबीनचे दाणे अंकुरले आहे. धानाची पिके शेतातच लोळली असून, त्याच्या लोंब्यामधील धान भरण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय, उभ्या असलेल्या धानाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा या बुरशीजन्य रोगाचा आणि तुडतुड्यांचाही प्रादुर्भाव झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ८० टक्के पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी खासगीत
बोलताना दिली.
चालू खरीप हंगामात जिल्ह्यात अंदाजे २ लाख ५० हजार हेक्टरमध्ये कपाशीची लागवड, किमान एक लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी आणि जवळपास ९२४ हेक्टरमध्ये धानाची रोवणी करण्यात आली. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने पेरणी व रोवणीला आधीच विलंब झाला होता. त्यातच मध्यंतरी संततधार पाऊस बरसला. या काळात ढगाळ व दमट वातावरणामुळे एकीकडे सूर्यप्रकाशाअभावी पिकांची वाढ खुंटली होती तर दुसरीकडे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला होता. पावसाने सवड देताच शेतकऱ्यांनी ही संपूर्ण पिके योग्य आंतरमशागत, खतांचे डोज, कीटकनाशके व मायक्रोन्यूट्रियन्टची फवारणी करून वाचविली. त्यामुळे त्यांचा उत्पादनखर्चही वाढला होता.
चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाच्या सरींमुळे कापणीला आलेले व कापणी केलेले सोयाबीन भिजले. त्यातच बुरशीमुळे शेंगा काळवंडल्या असून, शेंगांमधील दाणेही अंकुरले. कपाशीची बोंडं सडल्याने तसेच फुलोर गळाल्याने महत्त्वाचे पहिले दोन वेचे हातातून गेले. बोंड दाबल्यावर त्यातून पाणी बाहेर येण्याची तसेच आतील सरकी अंकुरण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ असल्याची माहिती काही वयोवृद्ध व अनुभवी शेतकºयांनी दिली. मौदा, रामटेक व कामठी तालुक्यातील लोंब्यावर व गर्भार अवस्थेतील धानाचे पीक लोळले आहे. त्यामुळे त्यातील धान भरणार नाही. शिवाय, मौदा तालुक्यातील धानाच्या पिकावर करपा व तुडतुड्यांचाही प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, या सर्व पिकांची प्रत खालावल्याने त्यांना बाजारात कवडीमोल भावाने विकावे लागणार आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची मागणी केली जात असली तरी प्रशासनाने ही प्रक्रिया अद्यापही सुरू केली नाही.
हमीभाव व खरेदी केंद्रे
केंद्र शासनाने कापसाचा हमीभाव प्रति क्विंटल ५,५५० रुपये (लांब धागा) व ५,२५५ रुपये (मध्यम धागा), सोयाबीन (पिवळी) ३,७१० रुपये, धान १,८१५ रुपये (सर्वसाधारण), १,८३५ रुपये (ग्रेड ए), मूग ७,०५० रुपये, उडीद ५,७०० रुपये जाहीर केले आहे. सध्या खुल्या बाजारात चांगल्या प्रतिच्या सोयाबीनला प्रति क्विंटल २,२२० ते २,७०० रुपये भाव मिळत आहे. कापसाचा उत्पादनखर्च किमान ७,२५० रुपये प्रति क्विंटल असताना हमीभाव मात्र कमी जाहीर करण्यात आला. राज्यात कापसाच्या खरेदीला अद्याप सुरुवात झाली नसली तरी बुºहाणपूर (मध्य प्रदेश) येथे कापसाला ३,७१० ते ४००० रुपये आणि पंजाब व हरियाणामध्ये ४,९०० ते ५,१०० रुपये भाव मिळत आहे. ही स्थिती मूग व उडिदाची आहे. शेतमालाचे खुल्या बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. अद्याप कुठेही खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शेतकरी दुहेरी संकटात
पावसामुळे पिके खराब झाल्याने शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत. त्यातच शेतमालाला खुल्या बाजारात कमी भाव मिळत आहे. शेतकºयांना सोयाबीन (चांगल्या प्रतिचे) किमान ५०० ते १००० रुपये, उडीद व मूग ५०० ते ७०० रुपये आणि कापूस १,५०० ते २,००० रुपये कमी भावाने विकावे लागत आहे.
४प्रतिकूल वातावरणामुळे बहुतांश पिकांचा उत्पादनखर्च वाढला आहे. पावसामुळे प्रतवारी खालावलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागणार आहे. खुल्या बाजारात मिळणारा कमी भाव व वाढता उत्पादनखर्च लक्षात घेता, यावर्षी शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Web Title: 4% crop loss in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती