शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

दपूम रेल्वेच्या ३८ अधिकारी- कर्मचाऱ्यांना ‘जीएम अवॉर्ड’

By admin | Updated: April 20, 2016 03:23 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ६१ व्या रेल्वे सप्ताहाचे आयोजन बिलासपूर मुख्यालयाच्या एन.ई. इन्स्टिट्यूट सभागृहात करण्यात आले.

कार्याचा गौरव : बिलासपूर मुख्यालयात समारंभनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ६१ व्या रेल्वे सप्ताहाचे आयोजन बिलासपूर मुख्यालयाच्या एन.ई. इन्स्टिट्यूट सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार उपस्थित होते. समारंभात दपूम रेल्वेच्या नागपूर विभागातील ३८ रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाव्यवस्थापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.समारंभात विभागातील विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी शिल्ड प्रदान केले. यात अभियांत्रिकी विभागाला सर्वोत्तम दक्षता शिल्ड, दहा उपविभागीय शिल्ड विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर मुख्यालयासह, बिलासपूर, रायपूर, नागपूर विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. समारंभात अभियांत्रिकी विभागाला सर्वोत्तम दक्षता शिल्ड, तुमसर रोड स्टेशनला सर्वोत्तम मायनर स्टेशन शिल्ड, भंडारा रोड स्थानकाला सर्वोत्तम मेजर स्टेशन शिल्ड, यांत्रिकी विभागाला सर्वोत्तम मिडियम डेपो गोंदिया डेमू शेड आणि कोचिंग डेपोसाठी, सामान्य विभागाला आय.टी. इम्प्लिमेन्टेशन शिल्ड, गोंदियाच्या सिग्नल आणि दूरसंचार विभागाला सर्वोत्तम सिग्नलिंग डेपो शिल्ड, तुमसर रोड स्टेशनच्या विद्युत विभागाला इलेक्ट्रिकल जनरल शिल्ड, गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाला सर्वोत्तम आरपीएफ पोस्ट शिल्ड, गोंदियाच्या वैद्यकीय विभागाला सर्वोत्तम हेल्थ युनिट सेंटर शिल्ड, गोंदियाच्या विद्युत व यांत्रिकी विभागाला सर्वोत्तम क्रू बुकिंग पॉर्इंट शिल्ड प्रदान करण्यात आले. ६१ व्या रेल्वे सप्ताहाचे आयोजन २१ एप्रिलला गुंजन सभागृहात करण्यात आले असून, यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल विभागातील अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र, रोख पुरस्कार देऊन सन्मानित करतील. (प्रतिनिधी)