हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्यक्तीच्या घरातील ३.७१ लाखाचे दागीने लंपास

By दयानंद पाईकराव | Updated: March 18, 2023 14:02 IST2023-03-18T14:01:09+5:302023-03-18T14:02:00+5:30

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

3.71 lakhs worth of jewelery in the house of a person admitted to the hospital | हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्यक्तीच्या घरातील ३.७१ लाखाचे दागीने लंपास

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्यक्तीच्या घरातील ३.७१ लाखाचे दागीने लंपास

नागपूर : हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या पती-पत्नीच्या घरातील ३.७१ लाखाचे दागीने चोरी केले. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ मार्चला सायंकाळी ५.३० ते १७ मार्चला दुपारी ३.३० दरम्यान घडली आहे.

महिपाल ब्रिजलाल सोनेवाने (५३, गुरुदत्त सोसायटी, रिंग रोड, दाभा) यांची आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती खराब झाल्यामुळे ते आपल्या घराला कुलुप लाऊन लोकमत चौकातील एका रुग्णालयात अ‍ॅडमिट झाले. घराची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी आपला साडभाऊ व साळीकडे सोपविली. ते सोनेवाने यांचे घरात पाहण्यासाठी ये-जा करीत होते.

दरम्यान शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता त्यांना अज्ञात आरोपीने घराचा कोंडा तोडून बेडरुममधील लाकडी कपाटात कापडी बॅगमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागीने किंमत ३ लाख ७१ हजार रुपये चोरून नेल्याचे दिसले. या प्रकरणी सोनेवाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान ठाण्याचे उपनिरीक्षक अभय फड यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: 3.71 lakhs worth of jewelery in the house of a person admitted to the hospital