शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

वन्य प्राण्यांसाठी ३५० पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:29 PM

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देपेंच, बोर, उमरेड करहांडला व पांढरकवड्याचा समावेशजूनपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी २० टँकर सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी गुरुवारी दिली.व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्यामध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे एप्रिल महिन्यापासून कोरडे पडायला सुरुवात होते. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सहज उपलब्धता व्हावी यासाठी विशेष पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या संपूर्ण क्षेत्रात नैसर्गिक १७९ पाणवठ्यांपैकी ७६ पाणवठ्यांवर बारमाही पाणी उपलब्ध आहे. माहे एप्रिल अखेरपर्यंत ६२ पाणवठ्यांवर एप्रिलपर्यंत व १६ पाणवठ्यांवर मेपर्यंत पाण्याची उपलब्धता राहते. यापैकी १२३ पाणवठ्यांवरर सोलर पंपाद्वारे पाणी पुरवठा सुरु असून १९ पाणवठ्यांवर हॅण्डपंपाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी सांगितले.कृत्रिम पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ६१ पाणवठ्यांवर शासकीय टँकरद्वारे तर १३७ पाणवठ्यांवर भाडेतत्वावरील ७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. माहे एप्रिल ते जून या कालावधीत कृत्रिम पाणवठ्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी २० टँकरची आवश्यकता भासणार असून त्यादृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. संरक्षित क्षेत्रात बंद पडलेल्या सोलर पंपाची दुरुस्ती तसेच ३१ बोअरवेलवर नवीन सोलरपंप बसविण्यात आले आहे. वन्य प्राण्यांना संरक्षित क्षेत्रातच पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.पेंच व्याघ्र पकल्प, तोतलाडोह, पेंच नदी, लोअर पेंच नदीच्या पात्रातील संलग्न असून उमरेड-पवनी-करहांडला अभयारण्य गोसेखुर्द प्रकल्पाजवळ आहे. तसेच बोर व्याघ्र प्रकल्प बोर धरणाजवळ असल्यामुळे वन्य प्राण्यांसाठी कायमस्वरुपी पाण्याची सोय सहज उपलब्ध आहे. यामुळे या परिसरात इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत कायमस्वरुपी पाण्याचे स्रोत सहजपणे उपलब्ध असतात. वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी दिली.

टॅग्स :forestजंगलWaterपाणी