मानलेल्या भाऊ-वहिनीकडून विश्वासघात, आजीच्या अंत्ययात्रेला गेल्यावर उडवले ३५ लाख
By योगेश पांडे | Updated: June 5, 2024 18:52 IST2024-06-05T18:50:24+5:302024-06-05T18:52:23+5:30
Nagpur : एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

35 lakhs was blown after going to grandmother's funeral, betrayed by a supposed brother and sister-in-law
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानलेला भाऊ व वहिनीकडूनच एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. आजीच्या अंत्यविधीसाठी व्यावसायिक गेल्यानंतर आरोपींनी घराच्या कपाटातून ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सागर दिलीप कारोकार (३८, प्रकाशनगर, आरती टाऊन, साईकृपा रेसिडेन्सी) असे संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या सोबत त्यांचा मानलेला भाऊ शशिकांत विश्वनाथ जोशी (५२) व वहिनी शिवाजी शशिकांत जोशी (४०) हेदेखील रहायचे. कारोकार यांच्या आजीचा मृत्यू झाल्याने २ जून रोजी सकाळी साडेसात वाजता ते अंत्यविधीसाठी गेले होते. त्या कालावधीत आरोपींनी बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख १७ लाख रुपये असा एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. कारोकार यांना घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.