शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

नागपुरात आज ३.५ लाख नळ राहणार कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:22 AM

१७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देटँकरही चालणार नाही : संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : १७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भागात ७० व पाईप लाईन नसलेल्या भागात ३३० टँकर धावतात. ते टँकरही बंद ठेवण्यात येणार आहेत.पावसाने दडी मारल्यामुळे शहरात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. तोतलाडोह कोरडा पडला असून नवेगाव-खैरीमध्ये नाममात्र पाणी शिल्लक आहे. अशी भीषण परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेमध्ये मंगळवारीही बैठक घेण्यात आली. दरम्यान, बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयावर सखोल चर्चा करण्यात आली. पाण्याच्या मोठ्या ग्राहकांसंदर्भात धोरण तयार करण्याची मनपाची योजना आहे. कन्हानमध्ये पाण्याचा स्तर चांगला आहे. त्यामुळे नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा करण्याचा विचार बोलून दाखवण्यात आला. परंतु, हा विचार प्रत्यक्षात उतरतो की नाही हे बुधवारीच स्पष्ट होणार आहे. पाणी पुरवठ्याचे पुढील नियोजन पावसावर अवलंबून आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत बुधवारनंतर शुक्रवारी (१९ जुलै) व रविवारी (२१ जुलै) पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.तर पाईप लाईनमध्ये दूषित पाणीशहरात २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेंतर्गत जुनी पाईप लाईन बदलवून नवीन पाईप लाईन टाकली जात आहे. आतापर्यंत ३४ टक्के काम पूर्ण झाले आहे. ६६ टक्के पाईप लाईन अद्यापही जुनी आहे. त्या पाईप लाईनमध्ये लिकेज आहेत. पाणी पुरवठा बंदच्या काळात त्या पाईप लाईनमध्ये दूषित पाणी शिरू शकते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांना दूषित पाणी मिळू शकते. पाईप लाईन चार्ज असते त्यावेळी त्यात दूषित पाणी शिरत नाही.विहिरी व बोअरवेलचा वापर वाढेलमनपाच्या पाणी कपातीमुळे नागरिक विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग वाढवू शकतात. मनपाने शहरातील ७५५ पैकी ४४१ विहिरींची सफाई केली आहे. ३१४ विहिरी दूषित आहेत. शहरात ५२५४ जुन्या बोअरवेल असून २७७ नवीन बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. पूर्व, उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरमधील वस्त्या बोअरवेलवर अवलंबून आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका