गुजरातमधून आयात केलेले ३ हजार किलो प्लास्टीक नागपुरात जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 23:49 IST2022-08-29T23:44:05+5:302022-08-29T23:49:28+5:30
मनपाच्या पथकाची कारवाई : २० हजारांचा दंड ठोठावला

गुजरातमधून आयात केलेले ३ हजार किलो प्लास्टीक नागपुरात जप्त
गणेश हुड
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी गुजरातमधून आयात करण्यात आलेले २ हजार ९४० किलो प्लास्टीक जप्त क रून २० हजारांचा दंड वसूल केला. पथकाला लकडगंज झोन क्षेत्रातील स्मॉल फॅक्ट्री भागात मौरानीपूर ट्रान्सपोर्ट कंपनीने बंदी असलेले प्लास्टीक गुजरातमधून आयात केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात लकडगंज, समरंजीपुरा व गांधीबाग झोनच्या पथकांनी कंपनीच्या गोदामावर छापा टाकून हा माल जप्त केला.
मौरानीपूर ट्रान्सपोर्ट कंपनीकडे आलेला प्लास्टीक साठा बालाघाट येथे जाणार होता. यात व्यावसायिक संजय जांगीड यांचा १२३० किलो, वेदप्रकाश पांडे यांचा ६०० किलो, दादू भार्ग यांचा ८१० किलो तर श्याम भाई यांचा ३०० किलो माल होता. या सर्वांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.