दहावीचा २९ टक्के, तर बारावीचा २५.८७ टक्के निकाल; पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 09:27 PM2021-10-20T21:27:01+5:302021-10-20T21:27:33+5:30

Nagpur News राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला.

29% for 10th and 25.87% for 12th; Results of supplementary examination announced | दहावीचा २९ टक्के, तर बारावीचा २५.८७ टक्के निकाल; पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित

दहावीचा २९ टक्के, तर बारावीचा २५.८७ टक्के निकाल; पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित

googlenewsNext

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला. राज्याचा दहावीचा निकाल २९ टक्के लागला असून, बारावीच्या निकालाची टक्केवारी २५.८७ टक्के आहे. (Results of supplementary examination announced)

या पुरवणी परीक्षेत दरवर्षीपेक्षा फार कमी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

दहावीच्या परीक्षेत १२३६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १०४७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३०५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यात २१०९ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यापैकी १८०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातून ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

- विभागीय मंडळानिहाय दहावीच्या निकालाची टक्केवारी

पुणे - २६.५२

नागपूर - ३९.९०

औरंगाबाद - ३१.६४

मुंबई - २०.७३

कोल्हापूर - २९.७२

अमरावती - ३९.५६

नाशिक - ४९.५४

लातूर - ३७.६९

कोकण - १८.४४

- विभागीय मंडळानिहाय बारावीच्या निकालाची टक्केवारी

पुणे - २६.७२

नागपूर - २०.३५

औरंगाबाद - ३६

मुंबई - १५.०६

कोल्हापूर - २२.३६

अमरावती - ११.८२

नाशिक - ३०

लातूर - ३६.४९

कोकण - ०

Web Title: 29% for 10th and 25.87% for 12th; Results of supplementary examination announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.