अमरावती विभागातील प्रकल्पात २७ टक्केच जलसाठा

By Admin | Updated: July 20, 2014 01:11 IST2014-07-20T01:11:18+5:302014-07-20T01:11:18+5:30

पावसाच्या महत्त्वाच्या १०० दिवसांपैकी अर्धाअधिक कालावधी संपला आहे. अमरावती विभागाची जून व जुलै महिन्याची पावसाची सरासरी २६७.८ मि. मी. एवढे अपेक्षित असताना केवळ ८१.६ मि.मी. पाऊस पडला.

27% water supply in Amravati division | अमरावती विभागातील प्रकल्पात २७ टक्केच जलसाठा

अमरावती विभागातील प्रकल्पात २७ टक्केच जलसाठा

खंडित पावसाचा परिणाम : गतवर्षीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी कमी
अमरावती : पावसाच्या महत्त्वाच्या १०० दिवसांपैकी अर्धाअधिक कालावधी संपला आहे. अमरावती विभागाची जून व जुलै महिन्याची पावसाची सरासरी २६७.८ मि. मी. एवढे अपेक्षित असताना केवळ ८१.६ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे ९ मोठे, २३ मध्यम व ४१७ लघु प्रकल्पातील जलस्तर कमी झाला आहे. सद्यस्थितीत सर्व जलाशयात केवळ ८६२ दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा साठा आहे. प्रकल्पांच्या संचय पातळीच्या केवळ २८ टक्के हा जलसाठा आहे.
पावसाळ्यात जून व जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा पूर्ण संचय पातळीपेक्षा अधिक असतो. मागील वर्षी १८ जुलैमध्ये या प्रकल्पांत १६७७ दलघमी जलसाठा होता. पूर्ण संचय पातळीच्या तो ५७ टक्के होता. यंदा मात्र केवळ ८१५ दशलक्ष घनमीटर एवढाच साठा आहे. हे प्रमाण २८ टक्के आहे. खंडित पावसामुळे २३ मध्यम व ४१७ मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील जलस्तर कमी झालेला आहे. मात्र पावसाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असल्याने ही तूट भरून येण्याची आशा आहे. पण सरासरीपेक्षा कमी पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 27% water supply in Amravati division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.