शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

भरधाव बस टिप्परवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 26 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:04 IST

मौदा : नागपूरहून मौदा-भंडारा मार्गे तुमसरला जात असलेली एसटी बस समोर उभ्या असलेल्या टिप्परवर मागून धडकली.

मौदा : नागपूरहून मौदा-भंडारा मार्गे तुमसरला जात असलेली एसटी बस समोर उभ्या असलेल्या टिप्परवर मागून धडकली. या भीषण अपघातात बसचालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, बसमधील 26 प्रवासी जखमी झाले. यात एक जण गंभीर तर 25 प्रवासी किरकोळ जखमी झाले. 16 जखमींना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले तर, 10 जणांना कढोली येथील दवाखान्यात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. केबिनमध्ये अडकलेल्या जखमी बसचालकास क्रेनने केबिन कापून बाहेर काढावे लागले. हा भीषण अपघात नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-7 वरील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कढोली (ता. कामठी) शिवारात रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली.बसचालक हेमंत प्रल्हाद कापसे (30, रा. तुमसर, जिल्हा भंडारा) व इंद्रसेन महादेवराव ठाकरे (70), अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात एकूण 26 प्रवासी जखमी झाले असून, त्यातील 12 पुरुष आणि चार महिला जखमींना उपचारार्थ नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. किरकोळ जखमींमध्ये राधेश्याम मानकर (40), सुषमा राधेश्याम मानकर (35), प्रथमेश राधेश्याम मानकर (12), कलश राधेश्याम मानकर (9) चौघेही रा. भेंडाळा, ता. मौदा, जिल्हा नागपूर, रिया राजेश गौरे (20, रा. तुमसर, जिल्हा भंडारा), दिनेश वर्मा (40), अशोक वर्मा (45), दीनाप्रसाद बाती (44) व चिमण वर्मा (80) चौघेही रा. बाभूळबन, नागपूर व प्रभाकर राऊत (23, रा. भंडारा) यांचा समावेश असून, या सर्वांवर कढोली येथील रामकृष्ण मठाच्या धर्मादाय दवाखान्यात उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.हे सर्व जण एमएच-40/8995 क्रमांकाच्या बसने प्रवास करीत होते. ती बस तुमसर (जिल्हा भंडारा) आगाराची असून, नागपूरहून कटंगीला जात होती. या बसने सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास कटंगीला जाण्यासाठी नागपूर बसस्थानकाहून प्रस्थान केले. बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. ती बस नागपूर-भंडारा महामार्गावरील कढोली शिवारात पोहोचताच समोर असलेल्या एमएच-31/सीबी-419 क्रमांकाच्या टिप्परवर मागून आदळली. या टिप्परचा समोरचा टायर फुटल्याने चालकाने तो रोडवर दुभाजकालगत उभा केला होता. बसच्या धडकेने टिप्पर दुभाजकावर चढला. त्यात बसच्या दर्शनीभागाचा चक्काचूर झाला.अपघात होताच कढोली येथील नागरिकांनी लगेच अपघातस्थळाकडे धाव घेतली. काही वेळातच मौदा पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. पोलिसांनी सर्व जखमींना नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढत मेयोमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. शिवाय, बसचालक केबिनमध्ये अडकल्याने केबिन क्रेनने कापण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.---ग्रामस्थांची मदतअपघात होताच कढोलीचे उपसरपंच पांडुरंग काकडे यांनी ग्रामस्थांना सूचना दिली. माहिती मिळताच कढोली येथील शंकर घुले, राजेश वाघ, दिनेश ढोले, गणेश गावंडे यांच्यासह अन्य नागरिकांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सुरुवातीला बसचे इंजिन बंद केले आणि पोलिसांना माहिती देत रुग्णवाहिका बोलावल्या. बसची डिझेल टँक फुटल्याने डिझेल रोडवर वाहत होते. ग्रामस्थांनी त्यावर माती टाकण्याची व्यवस्था केली. शिवाय, जवळच असलेल्या कंपनीतून क्रेन बोलावून बसची केबिन कापून जखमी बसचालकास बाहेर काढले. एवढेच नव्हे तर बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून त्यांना लगेच रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.---कारची बसला धडकया बसच्या मागे एमएच-49/एएस-1461 क्रमांकाची कार नागपूरहून मौद्याकडे जात होती. बस आणि कारमध्ये फारसे अंतर नव्हते. बस पुढे असलेल्या टिप्परवर आदळताच मागे असलेली कारदेखील बसच्या मागच्या भागावर आदळली. मात्र, कारचालकाने समयसूचकता बाळगत वेग कमी केल्याने कारमधील कुणालाही दुखापत झाली नाही. त्यात कारच्या दर्शनीभागाचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, टिप्पर त्या ठिकाणी अपघाताच्या दीड तास पूर्वीपासून उभा असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या टिप्परमध्ये डांबरमिश्रित गिट्टी होती.

टॅग्स :Accidentअपघात