२४ कॅरेट सोने १.१८ लाखांवर; चांदीची दीड लाखांकडे वाटचाल!
By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 23, 2025 20:40 IST2025-09-23T20:40:11+5:302025-09-23T20:40:52+5:30
Nagpur : गुंतवणूकदार आणि ग्राहक सोने व चांदी ही सुरक्षित गुंतवणूक समजून खरेदीला प्राधान्य देत आहेत.

24-carat gold at 1.18 lakhs; silver moving towards 1.5 lakhs!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. मंगळवारी दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ३ टक्के जीएसटीसह १.१८ लाख आणि चांदीचे किलो भाव १.४० लाखांवर पोहोचले. सहा महिन्यांपासून चांदीची दीड लाखांकडे वाटचाल सुरू आहे.
या किमतीनुसार सोमवारच्या तुलनेत सोने जीएसटीविना २,५०० रुपये आणि चांदीच्या किमतीत ३,५०० रुपयांची वाढ झाली. वाढत्या दरासोबतच सोने आणि चांदीची विक्री वाढत असल्याचे सराफांचे मत आहे. सणासुदीच्या काळात आणि जागतिक चलनवाढीमुळे हा प्रवाह अधिक वेगाने वाढत आहे.
गुंतवणूकदार आणि ग्राहक सोने व चांदी ही सुरक्षित गुंतवणूक समजून खरेदीला प्राधान्य देत आहेत. वाढत्या दरामुळे सराफांनाही अधिक दक्षता बाळगावी लागत आहे.