बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाकडे २०.८५ लाखांची घरफोडी
By योगेश पांडे | Updated: May 17, 2024 17:07 IST2024-05-17T17:06:45+5:302024-05-17T17:07:19+5:30
Nagpur : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

20.85 lakh house burglary to a family who had moved out of the town
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबाकडे चोरट्यांनी २०.८५ लाखांची घरफोडी केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
खेमचंद धरमदास आमेसर (६८, आरके पॅलेस, गरोबा मैदान परिसर, हरीहरनगर) हे १५ मे रोजी साडेतीन वाजता घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेरगावी गेले. त्यानंतर दोन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिने तसेच ७.०५ लाख रुपये रोख असा एकूण २०.८५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. आमेसर घरी परत आल्यावर हा प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन अज्ञात आरोपी चोरी करताना दिसले. आमेसर यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित परिसरात अनेक व्यापारी राहतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक जण सुट्यांमध्ये बाहेरगावी जातात. हीच संधी साधत चोरट्यांकडून रेकी करत घरफोडी करण्यात येते. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे.