शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट क्रीडा सुविधांसाठी २०० कोटी हवेत

By admin | Updated: May 20, 2014 00:55 IST

सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल खेळाडूंना उपलब्ध करून देऊ. यामुळे नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंची प्रगती वेगवान होऊ शकते, असे मत नागपूरचे जिल्हा क्रीडा

क्रीडा उपसंचालक विजय संतान यांचे मत : संकुल खेळाडूंसाठी खुले

नागपूर : सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल खेळाडूंना उपलब्ध करून देऊ. यामुळे नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंची प्रगती वेगवान होऊ शकते, असे मत नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी व प्रभारी क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी व्यक्त केले. स्पोर्टस् जर्र्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूर(एसजेएएन)तर्फे विवेकानंदनगर येथील कार्यालयात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. संतान म्हणाले, नागपुरात शालेयस्तरावर अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. परंतु त्यांना सरावासाठी किंवा व्यायामासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध नसल्यामुळे स्पर्धेत चमक दाखविण्यात अपयशी ठरतात. विभागीय क्रीडा संकुलात सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असून, त्यासाठी २०० कोटींची निधी आवश्यक आहे. क्रीडा संकुल परिसरात तयार होणारे सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान व अन्य कामे नागपूर सुधार प्रन्यास करणार असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विभागीय क्रीडा संकुलाला ‘पांढरा हत्ती’ म्हणून संबोधण्यात येत होते. परंतु संकुल आता खेळाडूंसाठी खुले करण्यात आले आहे. सकाळ, सायंकालीन सत्रात अनेक खेळाडू इन्डोअर हॉलमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि जिम्नॅस्टिक या खेळाचा सराव करतात. बॅडमिंटनचे आठ कोर्ट असून यापासून संकुलला महिन्याकाठी २ लाख २५ हजार रुपयाचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. यातून देखभालीचा खर्च निघत आहे. बॅडमिंटनपटूंची वाढती संख्या लक्षात घेऊन, कोर्टची संख्या वाढविण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. १०० खोल्यांचे युवा वसतिगृह विभागीय क्रीडा संकुलात युवा वसतीगृह तयार करण्यात येणार असून यामध्ये १०० खोल्या राहणार आहेत. यामुळे स्पर्धेच्यावेळी निवासाचा प्रश्न सुटणार आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी जुने आखाडे शोधून त्यांना सात लाख रुपये अनुदान व क्रीडा सुविधा व साहित्यासाठी क्रीडा संघटना व संस्थाना निधी देण्याची योजनाही राबविण्यात येणार आहे. संकुलात शूटिंग रेंज तयार करण्याबद्दल विचार सुरू आहे. शालेय स्पर्धेत सहभाही खेळाडूंनाप्रोत्साहित करण्यासाठी सीएसआर नवीन योजना असून यामध्ये कार्पोरेट सेक्टरची मदत घेण्यात येणार असल्याबद्दलही विजय संतान यांनी सांगितले. यंदा चार राज्य शालेय स्पर्धा नागपुरला यंदा चार राज्य शालेय स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. त्यात महिला बास्केटबॉल, शक्तीत्तोलन, खो-खो आणि वुडबॉलचा समावेश आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय व्हॉलिबॉॅल स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संतान यांंनी सांगितले. क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे होणार्‍या विविध स्पर्धा, वेळापत्रक व योजनांची संगणकाच्या माध्यमातून शाळा, खेळाडू व सामान्यांना मिळावी या उद्देशाने संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असेल असे ते म्हणाले. (क्रीडा प्रतिनिधी)