नागपूर मार्गे धावणाऱ्या १९ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:27 IST2018-01-01T23:25:08+5:302018-01-01T23:27:31+5:30

दिल्लीकडील भागात दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान, सोमवारी १९ रेल्वेगाड्यांना विलंब झाला. या गाड्यांची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

19 trains running through Nagpur, 'Late' due to fog | नागपूर मार्गे धावणाऱ्या १९ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’

नागपूर मार्गे धावणाऱ्या १९ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : वेटिंग रूम गर्दीमुळे फुल्ल

आॅनलाईन लोकमत
नागपूर : दिल्लीकडील भागात दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान, सोमवारी १९ रेल्वेगाड्यांना विलंब झाला. या गाड्यांची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
दिल्लीकडील भागात दाट धुके पडले आहे. धुक्यामुळे लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे बंद झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने या भागात रेल्वेगाड्या कॉशन आॅर्डरने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात रेल्वेगाडी क्रमांक १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १५ तास, १२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस १४ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद तेलंगणा एक्स्प्रेस ११ तास, १६०३२ श्री माता वैष्णोदेवी-चेन्नई सेंट्रल अंदमान एक्स्प्रेस ७.२० वाजता, १२६१६ दिल्ली सराय रोहिला-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ११ तास, १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस ७ तास, ०७००६ रक्सोल-हैदराबाद एक्स्प्रेस १६ तास, १२७२२ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम दक्षिण एक्स्प्रेस ९ तास, १५१२० मंडूआदीह-रामेश्वरम एक्स्प्रेस २.३० तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगणा एक्स्प्रेस ५ तास, १२५१२ त्रिवेंद्रम-
गोरखपुर राप्तीसागर एक्स्प्रेस ४.३० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ७ तास, १२२९६ दानापूर-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ४ तास, २२४०४ नवी दिल्ली-पुडुचेरी एक्स्प्रेस ७ तास, १२८५४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस २ तास, १७६०९ पटना-पूर्णा एक्स्प्रेस ४.३० तास, १२२६९ चेन्नई-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ६ तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेस ३ तास या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहावे लागले. उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे दुसऱ्या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी मागण्यासाठी प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात गर्दी केली होती.

Web Title: 19 trains running through Nagpur, 'Late' due to fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.