नागपुरात एक लाखामागे क्षयरोगाचे १६५ रुग्ण : आयएमए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:11 IST2019-03-26T23:09:23+5:302019-03-26T23:11:04+5:30
नागपुरात २०१८ मध्ये क्षयरोगाचे एकूण ९८५३ रुग्ण आढळून आले. यात ५११० रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमधून तर ४७४३ रुग्णांनी खासगी इस्पितळांमधून उपचार घेतले. क्षयरोगाबाबत इतर शहराच्या तुलनेत नागपूरची स्थिती बरी आहे. परंतु एक लाख लोकांमागे १६५ क्षयरागाचे रुग्ण आहेत. याला २०२५ पर्यंत प्रति लाख लोकांमागे १० रुग्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

नागपुरात एक लाखामागे क्षयरोगाचे १६५ रुग्ण : आयएमए
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात २०१८ मध्ये क्षयरोगाचे एकूण ९८५३ रुग्ण आढळून आले. यात ५११० रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमधून तर ४७४३ रुग्णांनी खासगी इस्पितळांमधून उपचार घेतले. क्षयरोगाबाबत इतर शहराच्या तुलनेत नागपूरची स्थिती बरी आहे. परंतु एक लाख लोकांमागे १६५ क्षयरागाचे रुग्ण आहेत. याला २०२५ पर्यंत प्रति लाख लोकांमागे १० रुग्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल व स्टेट कोऑर्डिनेटर डॉ. मिलिंद नाईक यांनी सांगितले, नागपुरात गेल्या वर्षी क्षयरोगामुळे १२८ रुग्णांचे बळी गेले. मृत्यूचे हे प्रमाण ६ टक्के आहे. भारत सरकारने क्षयरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे. त्याअंतर्गत एक मोहीम चालविली जात आहे. खासगी इस्पितळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पूर्ण मदत करेल. खासगी इस्पितळांमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. क्षयरोगाच्या रुग्णांनी औषधोपचार सुरू असताना मध्येच औषध घेणे बंद करू नये. पूर्ण कोर्स करावा. अन्यथा याचे दुष्परिणाम रुग्णांसोबतच समाजावरही पडतात. खासगी डॉक्टरांच्या पुढाकारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांची शासकीय स्तरावर नोंदणी होत आहे. २०१७ मध्ये खासगी इस्पितळात ६८४८४ रुग्णांनी उपचार घेतले. २०१८ मध्ये ही संख्या वाढून २६७७०६ झाली आहे. महाराष्ट्र क्षयरोग मुक्त करण्यासाठी आयएमएचे सक्रिय योगदान राहिले आहे. त्यांनी सांगितले, ‘निक्षय’ अॅप तयार करण्यात आले आहे. यामुळे रुग्णाची नोंदणी होताच त्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्याचे काम सुरू होते.