शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

१६ स्टार बस जप्त

By admin | Updated: August 11, 2015 04:02 IST

वंश निमयकडे प्रवासी व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकलेले असताना व मुदत देऊनही कर भरत

नागपूर : वंश निमयकडे प्रवासी व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकलेले असताना व मुदत देऊनही कर भरत नसल्याने अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरला सोमवारी १६ धावत्या स्टार बसेसवर कारवाई करावी लागली. ही कारवाई वाडी व हिंगणा मार्गावरील बसेसवर झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. या कारवाईने महानगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली. कारवाई थांबविण्यासाठी महापौरांनी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्याची माहिती आहे. मुंबई मोटार वाहन कर कायदा १९६९नुसार प्रवासी कर हा प्रति तिकिटावर साडेसतरा टक्के लावला जातो. २००७ पासून वंश निमयने या कराचा एकही रुपया भरलेला नाही. यामुळे प्रवासी कर ८ कोटी २० लाखांवर गेला आहे. याशिवाय मोटार वाहन कर कायदा १९५८ नुसार ७१ रुपये प्रति सीट, प्रति वर्षानुसार असलेला वाहन कर हा २०१३ पासून भरलेला नाही. हा कर १३ लाखांवर गेला आहे. एकूण वंश निमयला प्रवासी कर व वाहन कर मिळून असे ८ कोटी ३३ लाख रुपये भरायचे आहे. या संदर्भात आरटीओने ९ जुलै रोजी महापालिकेला नोटीस बजावून थकीत रक्कम जमा करण्याची सूचना केली होती. महापालिकेने वंश निमयला या संदर्भात नोटीस बजावली. थकीत रक्कम भरण्याचे निर्देश दिले. परंतु वंश निमयने महापालिकेकडेच रक्कम थकीत असल्याचा दावा केला होता. दरम्यानच्या काळात मनपा आयुक्तांच्या अधिकारात ही बाब नसतानाही त्यांनी आरटीओकडे पैसे भरण्यासाठी वेळ मागितला होता. या संदर्भात ‘लोकमत’ने ४ आॅगस्टच्या अंकात सामान्यांना मुदत न देणारे आरटीओ कार्यालय स्टार बसवर कारवाई करण्यास कचुराई का दाखवित आहे, असा प्रश्न उपस्थित करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची व परिवहन आयुक्तांच्या निर्देशाची दखल घेत गुरुवारीच आरटीओने स्टारबसवर कारवाई करण्याची रूपरेषा ठरविली. हिंगणा-वाडी प्रवाशांची धावाधाव४हिंगणा व वाडी मार्गावर दिवसभरात स्टारबसमधून सुमारे १० हजारावर प्रवासी ये-जा करतात. सोमवारी सकाळपासून आरटीओ, शहर कार्यालयाने कारवाई करीत एक-एक बसेसवर कारवाई सुरू केली. यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर तासन्तास उभे राहावे लागले. सायंकाळी ५ वाजतानंतर तर या दोन्ही मार्गावरील बससेवाच ठप्प पडली. परिणामी, या दोन्ही मार्गावरील बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली होती. बस नसल्याने प्रवाशांना आॅटोरिक्षा व अवैध प्रवासी वाहनातून वाहतूक करावी लागली.