शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

ऐकावे ते नवलच; तब्बल १५ वर्ष नागपुरातील एका महिलेच्या पोटात राहिला ‘स्टोन बेबी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 10:49 IST

वैद्यकीय जगताला अचंबित करणारे एक प्रकरण नागपुरात पहायला मिळाले आहे. एका महिलेच्या शरीरात ९ महिने नव्हे तर तब्बल १५ वर्षे भ्रूण होता.

ठळक मुद्देवैद्यकीय इतिहासातील दुर्लभ घटना जगभरातील ३०० वे प्रकरण

आॅनलाईन लोकमतनागपूर : मनुष्याने विकासाचे कितीही दावे केले तरी निसर्ग कधी काय धक्का देईल, याचा अंदाज बांधता येणे अशक्य आहे. वैद्यकीय जगताला अचंबित करणारे असेच एक प्रकरण नागपुरात पहायला मिळाले आहे. एका महिलेच्या शरीरात ९ महिने नव्हे तर तब्बल १५ वर्षे भ्रूण होता. आश्चर्याची बाब म्हणजे हा भ्रूण गर्भाशयात नव्हे तर पोटात होता. इतकी वर्षे शरीरात राहिल्याने भ्रूणाचे शरीर टणक झाले होते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘स्टोन बेबी’ असे संबोधण्यात येते. शहरातील ‘लॅप्रोस्कोपिक सर्जन’ डॉ.नीलेश जुननकर यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित महिलेला १५ वर्षांच्या यातनेपासून मुक्तता मिळाली.जयश्री तायडे यांना गेल्या १५ वर्षांपासून पोटदुखीची समस्या होती. ‘अ‍ॅसिडिटी’मुळे असे होत असेल असे त्यांना वाटायचे. मात्र काही दिवसांपासून त्रास जास्त वाढला होता व उलट्या होऊ लागल्या होत्या. अखेर त्या श्रद्धानंदपेठ येथील डॉ.नीलेश जुननकर यांच्याकडे तपासणीसाठी गेल्या. डॉ. जुननकर यांनी रुग्णाचे सिटी स्कॅन केले असता आतड्यांमध्ये ‘स्टोन’सदृश गोष्टीमुळे अडथळा निर्माण झाल्याने दिसून आले. यानंतर ‘लॅप्रोस्कोपी’ करण्यात आली असता डॉ. जुननकर यांनादेखील धक्का बसला. कारण ती ‘स्टोन’सदृश गोष्ट ही चक्क चार महिन्यांचा मृत भ्रूण होता. गर्भधारणेचे वय नसताना रुग्णाच्या पोटात हा गर्भ कुठून आला ही बाब आश्चर्यचकित करणारी होती. यानंतर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली असता या भ्रूणामुळे आतड्यांना इजा पोहोचल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्वरित भ्रूण आणि चार फुटांचे आतडे काढले.

पोटात कसा राहिला भ्रूणजयश्री तायडे यांचे १९९९ साली लग्न झाले होते व २००० मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला होता. २००२ मध्ये त्या परत गर्भवती राहिल्या, मात्र काही कारणांमुळे गर्भपात करण्यासाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. पूर्णपणे गर्भपात झाल्याचा त्यांचा समज झाला होता. मात्र प्रत्यक्षात तो गर्भ त्या प्रक्रियेदरम्यान पोटात स्थानांतरित झाला. ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. ४ ते ५ महिने तो गर्भ वाढला. मात्र त्यानंतर गर्भाशयासारखे पोषक वातावरण न मिळाल्यामुळे तो मृत झाला. वर्षागणिक तो भ्रूण ‘कॅल्सिफाय’ झाला व दगडासारखा टणक झाला. मात्र यामुळे आतड्यांना इजा पोहोचत गेली, असे डॉ. नीलेश जुननकर यांनी सांगितले.

१० व्या शतकात झाली होती पहिली नोंद‘स्टोन बेबी’चा प्रकार हा अतिशय दुर्मिळपणे आढळून येतो. ‘एक्टोपिक प्रेग्नन्सी’मध्ये भ्रूण हा ‘फॅलोपिन ट्यूब’मध्ये वाढतो व ही बाब जीवघेणी ठरू शकते. मात्र ‘स्टोन बेबी’च्या या प्रकाराला ‘लिथोपेडिओन’ असे म्हणतात. यात मृत भ्रूण हा गर्भाशयाबाहेर वाढतो आणि ‘कॅल्सिफाय’ होतो. या प्रक्रियेमुळे मातेच्या शरीरात संसर्ग होत नाही. आतापर्यंत ‘लिथोपेडिओन’च्या जगभरात केवळ ३०० प्रकरणांची नोंद झाली आहे. ९३६ ते १०१३ या कालावधीत अरब वैद्यकीय तज्ज्ञ अबू अल कासिम यांनी असे प्रकरण हाताळल्याची नोंद आहे. दर ११ हजार गर्भधारणेमागे एक प्रकरण अशाप्रकारचे होण्याची शक्यता असते. यातील अवघ्या १.८ टक्के गर्भधारणेचे परिवर्तन ‘लिथोपेडिया’मध्ये होऊ शकते, अशी माहिती डॉ.जुननकर यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्य