शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१४ अवैध प्रवासी वाहने जप्त

By admin | Updated: June 27, 2014 00:40 IST

शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली १४ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक तर दोन जीप आहेत. कधी नव्हे ते या अचानक झालेल्या कारवाईने

आरटीओची कारवाई : अनेक वाहनधारक भूमिगतनागपूर : शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली १४ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक तर दोन जीप आहेत. कधी नव्हे ते या अचानक झालेल्या कारवाईने अवैध प्रवासी वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कारवाईच्या भीतीने अनेक अवैध वाहनधारक भूमिगत झाले आहेत. ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात ‘मृत्यूचा महामार्ग कामठी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेऊन आरटीओ शहर कार्यालयाने ही कारवाई केली. नागपूर- कामठी रोडवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मागील १४ महिन्यात ५७ अपघात झाले आहेत. यात ५१ जण जखमी तर तब्बल २१ जणांना प्राणाला मुकावे लागले. असे असतानाही या मार्गावर पोलिसांसमक्ष मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. टाटा मॅजिक, अ‍ॅपे, सहासीटर अशा साधारण ३०० वाहनांतून ही अवैध वाहतूक बिनधास्त सुरू आहे. सहा सिट्सची परवानगी असताना १५-२० प्रवासी बसवून भन्नाट वेगाने ही वाहने वर्दळ करतात. नियमानुसार या वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही व्हेरायटी चौक ते कामठी मार्गावरील सर्व चौकांतून प्रवासी घेताना दिसतात. एलआयसी चौकात तर यांचा स्टॅण्ड आहे. पोलिसांसमोर ही वाहतूक सुरू असतानाही कारवाई नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कामठी रोडवर धावत असलेल्या शंभर ‘मॅजिक’ या दरमहा सात हजार रुपये तर सहासीटर दरमहा तीन हजार रुपये हप्ता देत असल्याची धक्कादायक माहिती यांच्यातीलच एका चालकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. त्याने सांगितले, गोलू नावाचा एक गुंड सात हजाराचा हप्ता जमा करतो. हा हप्ता एका आमदारासोबतच इंदोरा, मीठानिम दर्गा आणि गिट्टीखदान वाहतूक पोलीस विभागाला जातो. तर सहासीटरकडून कमरुबाबा नावाचा गुंड हप्ता गोळा करतो. गांधीबाग व इंदोरा वाहतूक पोलीस विभाग मिळून हा हप्ता दिला जातो, अशीही माहिती त्याने दिली. हे सविस्तर वृत्त प्रकाशित होताच वाहतूक पोलीस यंत्रणेने सक्रिय होणे आवश्यक होते, परंतु आरटीओ शहर कार्यालयाने याची दखल घेतली. (प्रतिनिधी)