विदर्भात १३ नव्या रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या २८५

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:24 IST2020-04-29T05:23:48+5:302020-04-29T05:24:01+5:30

यवतमाळ जिल्ह्यात ५, नागपुरात ४, अकोला व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी २ असे एकूण १३ नव्या रुग्णांचे निदान झाले.

13 new patients registered in Vidarbha; The number of patients is 285 | विदर्भात १३ नव्या रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या २८५

विदर्भात १३ नव्या रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या २८५

नागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात ५, नागपुरात ४, अकोला व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी २ असे एकूण १३ नव्या रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या विदर्भात २८५ झाली आहे.
नागपुरात कोरोनाबाधित मृताच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत ७० वर रुग्णांची नोंद झाली. परिणामी, सोमवारी रात्री या वसाहतीतील हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. नागपुरात रुग्णांची संख्या १३३ वर पोहचली आहे. यातील तीन रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात नवे ५ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ८६ झाली आहे.

Web Title: 13 new patients registered in Vidarbha; The number of patients is 285