‘नदीजोड’मधून वर्षाला १२ हजार कोटींचे उत्पन्न, ३,७१,२७७ हेक्टर जमीन ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:24 IST2021-02-05T15:24:19+5:302021-02-05T15:24:33+5:30

River News : ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची तरतूद आहे.

12,000 crore annual income from 'river confluence', 3,71,277 hectares of land under irrigation | ‘नदीजोड’मधून वर्षाला १२ हजार कोटींचे उत्पन्न, ३,७१,२७७ हेक्टर जमीन ओलिताखाली

‘नदीजोड’मधून वर्षाला १२ हजार कोटींचे उत्पन्न, ३,७१,२७७ हेक्टर जमीन ओलिताखाली

- गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर - ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची तरतूद आहे. केवळ सिंचनच नव्हे तर,  पेयजल, उद्योग, मत्स्योत्पादन, जलऊर्जा निर्मिती, पर्यटन, कृषी उत्पादकता अशा सर्व माध्यमातून रोजगार निर्मिती वाढविण्याचे नियोजन आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या सहा जिल्ह्यातील १५ तालुके सिंचनाच्या बाबतीत सधन होतील, यातून विदर्भाची अर्थव्यवस्था सुधारेल असे नियोजन आहे. सर्व जिल्ह्यातील पीकपद्धती वेगळी आहे. आज सिंचनाच्या सुविधांअभावी पुरेसे उत्पादन घेता येत नाही. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांमुळे तर अकोला जिल्हा दुष्काळामुळे चर्चेत आहे. या नदीजोड प्रकल्पातून संत्री, कॉटनबेल्टला नवसंजीवनी मिळू शकते. शेतीच्या उत्पादनातून अन्य प्रक्रिया उद्योग भविष्यात उभारले जाऊन त्यातून मोठी रोजगारनिर्मितीही अपेक्षित आहे.

या प्रकल्पाचा आराखडा २०१८ पासून तयार आहे. आता मंजुरीची आणि निधीची प्रतीक्षा आहे. वाढत्या महागाईच्या काळात प्रकल्पाची किंमतही वाढणार असल्याने राज्य सरकार आणि जनप्रतिनिधी कधी मनावर घेणार, हे आता महत्त्वाचे आहे.

जिल्हे, सिंचन, पिके 
 नागपूर - ९२,३२६ हेक्टर : सोयाबीन, कापूस 
 वर्धा - ५६,६४६ हेक्टर : सेलू (२४,३४९ हे.), आर्वी (३०,६५९ हे.), वर्धा (१,६३८ हे.) 
 अमरावती - ८३,५७१ हेक्टर : संत्री, कापूस 
 यवतमाळ - १५,८९५ हेक्टर : कापूस 
 अकोला - ८४,६२५ हेक्टर : कापूस, सोयाबीन 
 बुलडाणा जिल्हा ३८, २१४ हेक्टर : कापूस, ज्वारी, उन्हाळी कांदा 

उत्पन्नाचे वार्षिक स्रोत 
कृषी उत्पादन - २,१३३ कोटी ८१ लाख रु. 
पाणी कर (सिंचन सेवा शुल्क) - ५,५६९ कोटी रु. 
पेयजल पाणीपुरवठा - ११२ कोटी 
औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरठा-९५ कोटी २८ लाख रु. 
मासेमारी-३२ कोटी ३० लाख रु. 
कॅनल प्लन्टेशन - ४८.६६ कोटी   जलऊर्जा निर्मिती- १८८४ मे.वॅ. 
एकूण प्रस्तावित उत्पन्न - ११,७९९ कोटी ५२७ लाख रु. 

लिंकमधून पाण्याचा वार्षिक वापर
सिंचन - १२८६ दलघमी. 
पाणीपुरवठा योजना - ३२ दलघमी. 
औद्योगिकीकरण - ३९७ दलघमी. 
प्रस्तावित वापर - १,७७२ दलघमी.

Web Title: 12,000 crore annual income from 'river confluence', 3,71,277 hectares of land under irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी