आईच्या घरी गेलेल्या महिलेचे १.१० लाखाचे दागिने लंपास

By दयानंद पाईकराव | Updated: June 8, 2023 14:10 IST2023-06-08T14:09:45+5:302023-06-08T14:10:40+5:30

आरोपीचा शोध सुरु

1.10 lakh jewels of a woman robbed from a house who went to her mother's house | आईच्या घरी गेलेल्या महिलेचे १.१० लाखाचे दागिने लंपास

आईच्या घरी गेलेल्या महिलेचे १.१० लाखाचे दागिने लंपास

नागपूर : आपल्या घराला कुलुप लाऊन आईच्या घरी गेलेल्या महिलेच्या घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख पाच हजार असा एकूण १.१० लाखाचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ६ जूनला सायंकाळी सात वाजता ते बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घडली.

लक्ष्मी किशोर हारोडे (वय ३५, रा. दुर्गानगर कळमना) या शिलाईचा व्यवसाय करतात. त्यांचे पती मुलाला घेऊन आपल्या आईकडे गेले होते. घरी मुलगी आणि त्या एकट्याच होत्या. त्यामुळे घराला कुलुप लाऊन त्या मुलीसह आपल्या आईच्या घरी मिनिमातानगर येथे गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.

आरोपीने त्यांच्या बेडरुममधील लोखंडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख पाच हजार असा एकूण १ लाख १० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: 1.10 lakh jewels of a woman robbed from a house who went to her mother's house