उपराजधानीतील वाहन विक्रीत ११ टक्क्यांनी घट; इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:25 IST2024-12-09T15:23:57+5:302024-12-09T15:25:29+5:30

Nagpur : या वर्षात २३,६२० वाहनांची नोंद इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ

11 percent decline in vehicle sales in sub-capital; Consumer preference for electric vehicles | उपराजधानीतील वाहन विक्रीत ११ टक्क्यांनी घट; इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती

11 percent decline in vehicle sales in sub-capital; Consumer preference for electric vehicles

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर:
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक वाहन निर्मात्या कंपन्या विविध कार्स बाजारात आणत आहेत. या कार्सना भारतीय ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. अनेक कार कंपन्या सध्या इलेक्ट्रिक कार्स बनवण्याकडेसुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. नावाजलेल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीच्याही जाहिराती होऊ लागल्या आहेत. एकीकडे नवनवीन वाहने मार्केटमध्ये लाँच होत असतानाच दुसरीकडे मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीमध्ये ११ टक्क्याने घट झाल्याचे पुढे आले आहे.


प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरकडून मिळालेल्या माहिती अधिकारातील माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना ही माहिती मागितली होती. उपलब्ध माहितीनुसार, २०१९ मध्ये विक्री झालेल्या २५ हजार ३५७ वाहनांची नोंद नागपूर शहर आरटीओमध्ये झाली. त्यानंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा महामारीमुळे वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला. २०२० मध्ये १६ हजार ८०४ तर २०२१ मध्ये १९ हजार ३०२ वाहनांची नोंदणी झाली. २०२२ पासून परिस्थिती बदलू लागली. 


या वर्षात २४ हजार ३६७ वाहनांची नोंदणी झाली तर २०२३ मध्ये मागील पाच वर्षांतील सर्वाधिक, २६ हजार ७३१ वाहनांची नोंदणी झाली. २०२४ मध्येही वाहनांची विक्री वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र जानेवार ते नोव्हेंबरपर्यंत २३ हजार ६२० वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत कमी वाहनांची विक्री झाल्याचे दिसून येते


३ हजार ७०७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी 
एकूण वाहन विक्रीमध्ये घट झाली असली तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. १ नोव्हेंबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात १ हजार ९७२, १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या काळात ३ हजार ७५६ तर १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ३ हजार ७०७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली.


५० हजारांवर दुचाकी व २२ हजार कारची नोंदणी 
२०२२ ते २०२४ या वर्षांत शहर आरटीओ कार्यालयात ५० हजार २७३ तर २२ हजार ७२६ कार्सची नोंदणी झाली. या शिवाय १६५ बस, ५९५ ई-रिक्षा, १,६४६ गूड कॅरिअर, ८८० मोटार कॅब, ६४३ ऑटोरिक्षा यासह इतरही वाहने मिळून ७८ हजार २६३ वाहनांची नोंद झाली आहे.


वर्ष                       वाहन नोंदणी
२०१९                       २५,३५७ 
२०२०                       १६,८०४ 
२०२१                       १९,३०२ 
२०२२                       २४,३६७ 
२०२३                       २६,७३१ 
२०२४                       २३,६२०


 

Web Title: 11 percent decline in vehicle sales in sub-capital; Consumer preference for electric vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.