शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत १० टक्के वाढ

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 28, 2024 21:07 IST

वर्षभरात राज्यातील एकूण ४,३३२ प्रकल्पांची नोंद : विदर्भात ४३७ तर पुण्यात सर्वाधिक १,१७२ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी

नागपूर : नागपुरात बांधकाम क्षेत्राचा टप्पा वाढत असून प्रकल्पांची संख्या एक हजारावर गेली आहे. त्याचप्रमाणे महारेराकडे विदर्भातील बांधकाम प्रकल्पांच्या नोंदणीत दरवर्षी १० टक्के वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच विदर्भात ४४७ तर एकट्या नागपुरात ३३६ बांधकाम प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी झाली आहे. नागपुरात घरांच्या विक्रीसह मोठ्या कंपन्यांच्या बांधकाम प्रकल्पांचे काम सुरू आहे. सध्या नागपुरात ३३६ प्रकल्पांची नोंद झाली असली तरीही याआधी हा आकडा १७० ते २०० च्या आसपास असायचा. पुणेनंतर अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नागपूरची ही संख्या जास्तच आहे. गेल्यावर्षी पुणेमध्ये १,१७२ प्रकल्पांची नोंदणी झाली. त्यानंतर ठाणे ५९७, मुंबई उपनगरात ५२८, रायगड ४५०, आणि नाशिकमध्ये ३१० बांधकाम प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी झाली आहे.अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर आघाडीवर राज्यातील काही जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर बांधकाम क्षेत्रात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, नाशिकहून पुढे आहे. नागपूरच्या आसपास केवळ नाशिक आहे. यावरून नागपूरचे बांधकाम क्षेत्र पुणे आणि मुंबईप्रमाणेच संघटित होताना दिसत आहे. विदर्भात नागपूर पुढेच बांधकाम क्षेत्रात नागपूर विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. अमरावती, अकोला, वर्धा, वाशिम, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या तुलनेत विकासात पुढेच आहे. अन्य जिल्ह्यात बिल्डरांचे व्यक्तीगत घरांवर लक्ष्य असल्याने बिल्डरांचे प्रकल्प कमी प्रमाणात येत आहेत.राज्यात वर्षभरात ४,३३२ प्रकल्पांची नोंदणीमहाराष्ट्रात महारेराकडे नोंदणीसाठी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ५,४७१ नवीन प्रस्ताव आले होते. यामध्ये ४,३३२ नवीन प्रकल्पांना महारेराने नोंदणी क्रमांक दिला. विदर्भात ४४७, उत्तर महाराष्ट्रात ३४७, नाशिकमध्ये ३१० आणि मराठवाड्यात १४९ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाला. मुंबई क्षेत्रात एकूण १,९७६ प्रकल्पांची नोंदणी : ठाणे ५९७मुंबई उपनगर ५२८रायगड ४५०पालघर २२३मुंबई शहर ७७रत्नागिरी ६६सिंधुदुर्ग ३५

विदर्भात एकूण ४३७ प्रकल्पांची नोंदणी : नागपूर ३३६अमरावती ४५वर्धा २४चंद्रपूर १२अकोला ११वाशिम ०४भंडारा ०३बुलढाणा ०१गडचिरोली ०१

बिल्डरांच्या जाहिरातीमधील अनियमितता शोधून त्यांना शो कॉज नोटीसा देणे, व्हर्च्युअल सुनावणी घेऊन निरसन आणि विदर्भ व मराठवाड्यातील ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याचे काम आहे. महारेराकडे नागपूरसह विदर्भातील बांधकाम प्रकल्पांची नोंदणी वाढली आहे. नागपूरच्या विकासासोबतच बांधकाम प्रकल्पांची संख्याही वाढेल.संजय भीमनवार, उपसचिव, महारेरा (विदर्भ व मराठवाडा).

नागपुरात घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार प्रकल्पांची संख्याही वाढली आहे. सध्या नागपुरात ५०० चौ.मीटरवरील एक हजाराहून अधिक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. विकासासोबत दरवर्षी १० टक्के मागणी वाढत आहे. महामेट्रोचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या पूर्णत्वानंतर नोंदणी संख्या दुप्पट, तिपटीवर जाईल.प्रशांत सरोदे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई मेट्रो.

 

टॅग्स :nagpurनागपूर