शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

By नरेश डोंगरे | Updated: November 4, 2025 20:35 IST

मालगाडीवर पॅसेंजर आदळली : १० जणांचा मृत्यू, दोन डझनावर प्रवासी जखमी : जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रायगडहून वेगात येणारी रेल्वे पॅसेंजर मालगाडीवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जाते. मृतांमध्ये महिला आणि लहान मुले यांचा समावेश अधिक असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास बिलासपूर (छत्तीसगड)जवळ लाल खदान परिसरात हा भयावह अपघात घडला. अपघात इतका भीषण आहे की मालगाडीला धडकल्यानंतर कोरबा-पॅसेंजर ट्रेनचे अनेक डबे पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले. अनेक डबे रुळाखाली उतरले. अपघातानंतर ट्रेनमधील हादरलेल्या प्रवाशांनी एकच कल्लोळ केला. नातेवाईक तसेच सोबतच्या प्रवाशांना झालेल्या गंभीर जखमा बघून अनेकजण थरारले. दरम्यान, माहिती कळताच बिलासपूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, बिलासपूर झोनचे रेल्वेचे शिर्षस्थ अधिकारी, आरपीएफ, जीआरपीचा ताफा आणि मोठ्या संख्येतील रेल्वेचे कर्मचारी बचाव कार्यासाठी घटनास्थळी धावले. तोपर्यंत प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.

मृत आणि जखमींचा आकडा

अपघातानंतर डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरच्या साहाय्याने डबे फोडण्याचे काम सुरू आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अंधार पडल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याचे संबंधितांनी सांगितले. लोको पायलट केबिनमध्येच अडकलेले असून मृत आणि जखमींची अचूक संख्या जाहीर करणे तूर्त शक्य नसल्याचे रेल्वे अधिकारी म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश ?

अपघात छत्तीसगडमध्ये झाला असला तरी या ट्रेनमध्ये विदर्भ, महाराष्ट्रातील प्रवासीही मोठ्या संख्येत असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासंबंधाने अधिकृत माहिती वृत्तलिहिस्तोवर मिळाली नाही. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

बिलासपूर–कटनी रेल्वे मार्ग ठप्प

या अपघातानंतर बिलासपूर–कटनी रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे काही एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या नागपूर मार्गे वळविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

रेल्वेची हेल्पलाइन

या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी केले. त्यानुसार, 7777857335 (बिलासपूर स्टेशन), 8294730162 (पेंड्रा रोड) तसेच दुर्घटनास्थळी तात्काळ मदतीसाठी 9752485499 आणि 8602007202 हे दोन विशेष क्रमांक उपलब्ध आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bilaspur Train Tragedy: 10 Dead, Many Injured, Helpline Numbers Issued

Web Summary : A train collision near Bilaspur, Chhattisgarh, resulted in 10 fatalities and numerous injuries. The accident involved a passenger train and a freight train, causing significant damage. Rescue operations are underway, and helpline numbers have been issued for assistance. Many passengers feared to be from Maharashtra.
टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघातChhattisgarhछत्तीसगडrailwayरेल्वेbilaspur-pcबिलासपुरDeathमृत्यूnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र