सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन; मंदीच्या काळातील ही सुवर्णसंधी सोडू नका, नाहीतर पस्तावाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:13 IST2020-04-07T16:11:45+5:302020-04-07T16:13:44+5:30
समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि मार्केट पडलेले आहे. त्यामुळे पुढच्या चार वर्षात ते पैसे मार्केटमध्ये दर महिन्याला गुंतवले जावेत अशी स्ट्रॅटेजी आहे.

सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन; मंदीच्या काळातील ही सुवर्णसंधी सोडू नका, नाहीतर पस्तावाल!
हातात एकरकमी पैसे आहेत ! मार्केट सुद्धा पडलेलं आहे ! अशावेळी सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) तुम्हाला लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी बेस्ट ठरतो. सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनमध्ये दोन फंड निवडायचे असतात. त्यातला एक फंड एकरकमी गुंतवणुक वाला असतो म्हणजेच तुमच्याकडे असलेले पैसे फंडात सगळेच्या सगळे एकाच वेळेला गुंतवायचे आणि दुसरा फंड टारगेट फंड म्हणून निवडायचा आणि पहिल्या फंडातून दुसऱ्या फंडात दर महिन्याला एक फिक्स रक्कम वळती करायची. म्हणजेच एस आय पी सारखे दर महिन्याला पैसे इक्विटी फंडात गुंतले जातात व त्याला एक शिस्त प्राप्त होते.
हे मॉडेल कसे असावे ?
समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि मार्केट पडलेले आहे. त्यामुळे पुढच्या चार वर्षात ते पैसे मार्केटमध्ये दर महिन्याला गुंतवले जावेत अशी स्ट्रॅटेजी आहे. दर महिन्याला दोन हजार रुपयाची सिस्टिमॅटिक ट्रान्सफर ऑर्डर द्यायची. म्हणजेच एक लाख रुपयातून दर महिन्याला 2000 म्हणजेच वर्षाला 24000 असे चार वर्ष सिस्टिमॅटिकली पैसे इक्विटी फंडात पोहोचतात. तोपर्यंत मार्केटमध्ये रिकव्हरी आलेली असते आणि रिकव्हरी फेजमध्ये हळूहळू तुम्ही गुंतवणूक केलेली असल्यामुळे तुमच्याकडे कमी नेट असेट व्हॅल्यूचे युनिट्स जमतात. जेव्हा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते तेव्हा तुमचा फंड सुद्धा वाढायला लागतो आणि गुंतवणुकीची फळं मिळायला सुरुवात होते. पण यासाठी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे.
मार्केटमध्ये मंदी असेल तर सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन द्वारे जोखीम घ्यायची तयारी असेल तर म्युच्युअल फंड सही है!