मराठी जोक : बायकोला गप्प करण्यासाठी नवऱ्याला सापडली वस्तू....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 17:17 IST2023-08-01T17:17:32+5:302023-08-01T17:17:50+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायकोला गप्प करण्यासाठी नवऱ्याला सापडली वस्तू....
बायकोला बरं वाटत नव्हतं...
नवरा तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला..
डॉक्टरांनी ताप चेक करण्यासाठी तिच्या तोंडात थर्मामीटर ठेवलं...
डॉक्टरांनी महिलेला काही वेळ तोंड बंद ठेवण्यास सांगितलं..
तितक्यात काही इतर कामं आल्यानं डॉक्टरांचं महिलेकडे दुर्लक्ष झालं...
महिला गप्प बसून होती.. २-५ मिनिटं अशीच गेली...
नवरा बायकोकडे पाहत होता...
अखेर न राहवून त्यानं डॉक्टरांना विचारलं...
''डॉक्टर साहेब, ही जादुई वस्तू कितीला मिळते हो..?''