शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

डिझाईनमागे असतं शास्त्र आणि विचार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 7:20 AM

माणसांनी वस्तू घडवल्या की वस्तूंनी माणसाला? या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली असावी? म्हणजे मोबाइल फोन ‘जसा’ आहे, तो ‘तसा’ कसा घडला असेल? खुर्ची किंवा सोफा आज जसे आहेत तसे घडतो कोणकोणत्या टप्प्यातून गेले असतील? हे सगळे कोणी, कसे, कोणत्या मार्गाने आणि दृष्टीने घडवले असेल? आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचा आकार जसा दिसतो, तसा तो घडत येण्यामागे आणि बदलत राहाण्यामागे कोणता विचार आणि शास्र असते? 

-हृषिकेश खेडकर

माणसाचे एकवेळ माणसावाचून चालेल; पण वस्तूंवाचून मात्र अडेल.- हे वाक्य काहीसे अतिरेकी उद्धट वाटेल; पण ते सत्य आहे.आत्ता तुम्ही जिथे कुठे बसून हे वाचत असाल, त्याच्या आजूबाजूला सहज एक नजर टाका. माणसे असतील किंवा नसतीलही; पण ‘वस्तू’ असतीलच. हातातले वर्तमानपत्र, मोबाइल फोन, डोळ्यावरला चष्मा, बुडाखालची खुर्ची किंवा सोफा, समोरचे दार, शेजारचा चहाचा कप, दारातल्या चपला, अंगातला टी-शर्ट.. मोजू तितक्या कमीच !या वस्तूंशिवाय आपण कसे जगू? माणसांनी वस्तू घडवल्या की वस्तूंनी माणसाला? या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली असावी?म्हणजे मोबाइल फोन ‘जसा’ आहे, तो ‘तसा’ कसा घडला असेल? खुर्ची किंवा सोफा आज जसे आहेत तसे घडेतो कोणकोणत्या टप्प्यातून गेले असतील? हे सगळे कोणी, कसे, कोणत्या मार्गाने आणि दृष्टीने घडवले असेल? आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचा आकार जसा दिसतो, तसा तो घडत येण्यामागे आणि बदलत राहाण्यामागे कोणता विचार आणि शास्र असते?- या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची वाट एका संकल्पनेकडे जाते : डिझाइन !आपल्या आयुष्यातल्या हरेक वस्तूला तिच्या उपयुक्ततेनुसार एक ‘आकार’ असतो. म्हणजे ‘डिझाइन’ असते.डिझाइन म्हणजे काय? हा प्रश्न समोर आला म्हणजे आपल्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण होतात. कपडय़ांवरचे डिझाइन, रांगोळीचे डिझाइन, बाटलीचे डिझाइन, घराचे डिझाइन, मोबाइलचे डिझाइन अशा एक ना अनेक मानवनिर्मित गोष्टींचे उल्लेख करताना आपण डिझाइन हा शब्द सहज वापरतो. या शब्दामागचे व्याकरण शोधायला गेलो, तर आणखी वेगळी गंमत सापडते. ‘डिझाइन आजच्या जीवनशैलीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे’ - यात डिझाइन हा शब्द नाम म्हणून वापरला आहे. ‘या टी-शर्टमध्ये तुमच्याकडे अजून काही डिझाइन्स आहेत का?’-  यात डिझाइन सर्वनाम म्हणून वापरला आहे.‘घराचे डिझाइन बनवण्यासाठी आम्ही आर्किटेक्टला भेटणार आहोत’ - यात डिझाईन क्रियापद म्हणून वापरला आहे. मी म्हणत होतो ती गंमत तुमच्या लक्षात आली असेलच. डिझाइन हा शब्द कोण, कोणासाठी आणि कुठल्या अनुषंगाने वापरतो आहे त्यावर ‘डिझाइन’ या शब्दामागचा व्यवहारातला अर्थ आणि हेतू ठरतो. जॉन हॅसकेट नावाचा एक जाणकार म्हणतो की, ‘डिझाइन’ हा शब्द इंग्रजीतील ‘Love’ या शब्दाप्रमाणो आहे. ‘Love’ या शब्दाचा उपयोग कोण, कोणासाठी आणि कुठल्यासंदर्भात करतो त्याप्रमाणो या शब्दाचा अर्थ बदलतो. उदाहरणादाखल त्यांनी बनवलेले एक रंजक वाक्य येथे नमूद करतो Design is to design a design to produce a design.या शब्दाचा उगम इसवी सन 1350ते 1400 काळात लॅटिन भाषेत आढळतो आणि ऑक्सफर्ड शब्दकोशाप्रमाणो याचा अर्थ ‘एखादी गोष्ट कशी असावी किंवा दिसावी हे ठरवण्यासाठी असणारी पद्धत किंवा कला’ असा होतो. इथे एक गोष्ट नक्की नमूद केली पाहिजे की, कलेचा उगम आणि मानवी अस्तित्वात असणारा कलेचा आवाका हा मानवी संस्कृतीत डिझाइनपेक्षा हजारो वर्ष जुना आहे. मग या सगळ्या विचारांच्या कोलाहलात डिझाइनची व्याख्या मांडायची झाली तर एक प्रयत्नअसा असू शकतो :‘आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या जगण्याला अर्थ देण्यासाठी मानवनिर्मित पर्यावरणाला घडवण्याची आणि आकार देण्याची मानवी क्षमता म्हणजे डिझाइन!’ - ह्या मानवी क्षमतेचे प्रमाण आणि आवाका आजमवायचा असेल तर हा लेख तुम्ही जिथे बसून वाचत आहात तिथे आजूबाजूला जरा नजर फिरवून बघा. मग ते घर असेल, ऑफिस असेल, ग्रंथालय असेल किंवा रेल्वेचा डबा असेल; एक मात्र नक्की की त्या पर्यावरणातली प्रत्येक गोष्ट ही मानवनिर्मित आहे, इतकेच काय तर त्या पर्यावरणात असणा-या झाडालादेखील आपण आकार दिला आहे किंवा त्याची वाढ आपल्या गरजेप्रमाणो आपण नियंत्रित केली आहे. थोडक्यात काय तर ह्या पर्यावरणाला आपल्या गरजा आणि अपेक्षांच्या कक्षांमध्ये घेऊन मूळ स्वरूपात असलेल्या खूप कमी गोष्टी आज आपण भूतलावर अस्तित्वात ठेवल्या आहेत.या लेखमालेचा उद्देश मानवनिर्मितीच्या कक्षा नाकारणो नसून डिझाइन क्षेत्रात मानवाने केलेल्या प्रगतीच्या कार्याची दखल घेणो हा आहे. उपलब्ध साधन सामग्रीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती करण्याची आपली क्षमता हे या भुतलावर असणा-या मानवी अस्तित्वाचे द्योतक आहे. इतर कुठल्याही प्राणिमात्रंमध्ये ही क्षमता इतक्या प्रगत थराला पोहोचलेली दिसत नाही. केवळ ह्या क्षमतेमुळे आपण आपला अधिवास आणि सभ्यता एका विशिष्ट प्रकारे घडवू शकलो आहोत. ‘डिझाइन’ला भाषेइतकेच महत्त्व आहे कारण माणूस हा ‘माणूस’ असल्याच्या सत्याला बळकटी देणारे हे द्योतक आहे. मानव निर्मितीची ही क्षमता अनेक मार्गानी आपण अस्तित्वात आणत असतो. जसे की स्थापत्यकला, बांधकाम, अभियांत्रिकी, प्रॉडक्ट डिझाइन, फॅशन डिझाइन इत्यादी.  थोडक्यात आपल्या जगण्याला द्विमितीय आणि त्रिमितीय आयाम देणो हा यामागचा उद्देश. दैनंदिन जीवनातील वस्तू, संवाद आणि पर्यावरण मग ते घराशी निगडित असो, कामाच्या जागेशी निगडित असो, रस्त्याशी, सार्वजनिक ठिकाणाशी किंवा आपल्या प्रवासाशी का निगडित असेना; प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आपण या जगण्याला आणि जगाला आकार देत असतो.मानवनिर्मितीच्या क्षमतेला ‘डिझाइन’ला जर इतके आयाम असतील तर ते जाणून घेण्यासाठी आपण सुरुवात करणार तरी कुठून? याचे उत्तर मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात दडले आहे. काळाच्या अनुषंगाने उलगडत जाणारे उत्क्रांतीच्या इतिहासातले हे थर डिझाइनची गोष्ट सांगत जातात. ह्या गोष्टीची सुरुवात होते सुमारे पंचवीस लाख वर्षापूर्वी आफ्रिका खंडात, जेव्हा माणूस अन्नाच्या शोधात भटकत होता. स्वत: शिकार करणो किंवा इतर हिंस्र पशूंनी केलेल्या शिकारीतला वाटा खाणो हेच त्याच्या उपजीविकेचे साधन होते. भटकंती करणारा हा मनुष्य प्राणी निसर्गात आढळणा-या सर्वसाधारण दगडाला घडवून प्राण्याची त्वचा आणि मांस कापण्यासाठी एक हत्यार किंवा साधन बनवू लागला. या हत्याराकडे निरखून बघितले तर लक्षात येईल की याची एक बाजू मजबूत पकडीच्या दृष्टीने जाड आणि गोलाकार बनवली गेली आहे तर दुसरी बाजू बारीक आणि धारदार आहे. अनेकदा हिंस्र श्वापदांनी खाऊन संपलेल्या शिकारीत माणसाला केवळ राहिलेल्या हाडांचा हिस्सा मिळे. अशावेळी या हत्याराचा वापर हाडे फोडून त्यातील अत्यंत पौष्टिक असा ‘बोन मॅरो’नामक द्रवपदार्थ काढण्यासाठी केला जात असे. वैज्ञानिक दृष्टय़ा असाही एक कयास आहे की माणसाच्या मेंदूच्या विकासात या बोन मॅरो सेवनाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आज भागणा-या भुकेच्या आनंदापेक्षा उद्याच्या अन्नाची भ्रांत माणसाला कायमच सतावत असते. मनुष्य प्राणी आणि जनावरांमध्ये या हत्याराने सगळ्यात मोठा फरक घडवून आणला तो म्हणजे गरजेइतक्या मांसाचे भक्षण झाल्यावर, उरलेल्या अन्नाचे तुकडे  करून माणूस ते भविष्यासाठी साठवून ठेवू लागला. निसर्गात आढळणा-या साधनसंपत्तीचा वापर करून बनवलेल्या या गोष्टींनी मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी दिली. आपल्या डिझाइनच्या जगाला इथून सुरुवात होते, चला तर मग येथून पुढे येणा-या लेखन मालिकेत आपण परिचित जाणवूनही अपरिचित असणा-या या डिझाइनच्या दुनियेत फेरफटका मारूया.

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आहेत)