शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

गिधाड रेस्तराँ

By admin | Updated: September 9, 2016 16:28 IST

एक आदिवासी पाडा. जो एकदिलानं सरकारी योजनांना प्रतिसाद देतो आणि म्हणता म्हणता गाव बदलतं, आणि आपली नवी ओळख बनवतं..

- अझहर शेखबदल स्वीकारण्याची मानसिकता असेल तर एक आदिवासी पाडाही किती बदलू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम आदिवासी खोरीपाडा. हा पाडा राज्यात आदर्श आदिवासी पाडा म्हणून ओळखला जातो. २०१५ साली राज्य शासनाने संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार देऊन त्याचा गौरवही केला होता. अलीकडेच साजरा झालेल्या गिधाड दिनानिमित्त त्या पाड्यात जाण्याचा योग आला. गिधाड संवर्धनासाठी या गावात एक ‘रेस्तरॉँ’ सुरू करण्यात आलं आणि गिधाडांची संख्याही वाढली. गिधाड शुभ नाही असं मानणाऱ्या गावानं गिधाडांचं स्वागत किती मायेनं केलं याचं हा पाडा हे एक उदाहरण आहे.खोरीपाडा हा ८६ कुटुंबांचा एक पाडा. वनविभागाचं आवाहन गावानं स्वीकारलं. आज या पाड्यावरच्या सर्व घरांमध्ये वनविभागाच्या मदतीने एलपीजी गॅसवर स्वयंपाक होतो. ‘चूल’ अपवादानंच पेटते. जंगल संरक्षण, वनजमिनींचं संरक्षण, वनसंपदेचे संवर्धन आणि वन्यजिवांविषयीचे प्रेम हे सारं या पाड्यावर गप्पांतून नाहीतर कृतीतून भेटत जातं. आठ ते दहा वर्षांपूर्वी मात्र खोरीपाड्याची स्थिती वेगळी होती. या ठिकाणी वनविभागाच्या जमिनींवर आदिवासींनी अतिक्रमण करत ७० हेक्टर जागेवर शेती सुरू केली होती. खोरीपाड्या-भोवती असणारा संपूर्ण डोंगर ओसाड पडलेला होता. २०१२ साली तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी राजन गायकवाड, वनरक्षक काशीनाथ वाघेरे आदिंनी ग्रामसभा केली. तत्पूर्वी २००५ पासून अस्तिवात असलेल्या मात्र मूर्च्छित अवस्था प्राप्त झालेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीला खऱ्या २०११ पासून ऊर्जितावस्था प्राप्त झाली. एकूण २४ लोक या समितीत कार्यरत आहेत.२०१२ साली पावसाळ्यात वनविभाग व खोरीपाडा येथील रहिवाशांनी एकत्र येऊन निसर्गसंवर्धनासाठी तीस हेक्टर जागेत ३३ हजार भारतीय प्रजातीची रोपांची लागवड केली. आवळा, शिवण, काजू, अर्जुन, सादडा, खैर, शिसू, हिरडा, बेहडा, मोह, करंज, आंबा अशा रोपांची लागवड यावेळी करण्यात आली.खोरीपाडा येथे पाऊस प्रचंड प्रमाणात होतो; मात्र डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी नद्या-नाल्यांमध्ये वाहून जात होते. त्यामुळे उन्हाळ्यात खोरीपाडा येथे पाणीटंचाई असतेच. त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेत गावकऱ्यांच्या मदतीने डोंगरावरील पावसाचे पाणी अडविण्यासाठी समपातळीवर स्तरावर चर खोदले. या खोदकामातून निघालेल्या मातीच्या भरावावर बांबू, अडुळसा अशी प्रजातीची लागवड केली. चार वर्षांमध्ये संपूर्ण डोंगराला हिरवाईचे कोंदण लाभले असून, वन्यजिवांची संख्याही वाढली आहे. बिबट्या, मोर, ससे, कोल्हे, गिधाड अशा विविध प्रकारच्या वन्यजिवांचे वास्तव्य या भागात आहे. २०१४मध्ये तीस हेक्टर क्षेत्राचे विविध भाग वनविभागाने केले. त्यापैकी ६२ लोकांना रोपवन संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली. प्रतिरोपामागे दरमहा पन्नास पैसेप्रमाणे रक्कम संरक्षणासाठी वनविभागाने निश्चित केली. दरमहा प्रत्येकाला किमान पाचशे रुपये या माध्यमातून मिळत आहे. एकूण ६२ लोक ही वनसंवर्धनाची जबाबदारी पार पाडत आहेत. वन संरक्षणामुळे गवताची चांगली वाढ झाली. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्नही सुटला. आदिवासींनी गवत कापणी वेळोवेळी केल्याने उन्हाळ्यात वणव्यापासूनही वन सुरक्षित राहिले. खोरीपाड्यामध्ये ८६ कुटुंबांना एलपीजी गॅस २५ टक्के अनुदानावर गॅस नोंदणी केली. सर्वांच्या घरात सध्या गॅसवर स्वयंपाक होतो. गॅस नोंदणीची ७५ टक्के रकमेचा भार वनविभागाने पेलला. स्वयंपाकासाठी लागणारा लाकुडफाटा जमा करण्याची भ्रांत मिटली आणि पर्यायाने जंगलतोेडीलाही आळा बसला. खोल सलग समपातळी स्तर घेतल्याने पाण्याची पातळी वाढली भूगर्भ पातळी वाढल्याने तीन कूपनलिका केल्या होत्या त्यांना पाणी चांगले लागले. ८६ कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. याबरोबरच येथील डोंगराळ भागामध्ये विविध वनऔषधी वृक्ष, वेली, झुडपे या भागांमध्ये आढळून येतात. हा पाडा क्षयरोगमुक्त व कुपोषणमुक्तही झाला. साऱ्या गावानं पुढं होत एकदिलानं काम केलं तर गाव किती बदलतं याचं हा पाडा हे एक उदाहरण आहे.आंतरराष्ट्रीय गिधाड संरक्षण दिन नुकताच साजरा झाला. जगाच्या पाठीवरून निसर्गातील महत्त्वाचा एक घटक असलेला गिधाड पक्षी नामशेष होत चालला आहे. गिधाडे वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्नही होत आहेत. जगभरात गिधाडाच्या विविध जाती आढळून येतात. भारतात प्रामुख्याने दोन जाती आढळतात. त्यामध्ये पांढऱ्या पाठीचे गिधाड आणि लांब चोचीचे गिधाड. खोरीपाडा या आदिवासी गावालगत डोंगरांच्या पायथ्याशी ‘गिधाड रेस्तराँ’ सुरू करण्याची संकल्पना वनविभागानं मांडली. गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. सर्व आदिवासींना विश्वासात घेऊन २०११ साली योग्य जागेचा शोध सुरू झाला. आणि या गावात गिधाडांसाठी रेस्तरॉँ सुरू झालं. आज खोरीपाड्याची ती ओळखच बनली आहे. या गावात गिधाडांच्या संख्येत वाढ होत गेली आणि गेल्या पाच वर्षामध्ये २५० गिधाडांची या ठिकाणी नोंद झाली.(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीमध्ये सहायक उपसंपादक आहेत.)

azharsk62@yahoo.com